ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईलची ‘चलती’; दोन महिन्यांत तब्बल एवढ्या मोबाईलची झाली विक्री

सुवर्णा नवले
Wednesday, 7 October 2020

लॉकडाउनमध्ये २२ मार्च ते १ मे पर्यंत मोबाईल दुकाने लॉक होती. त्यानंतर वर्क फ्रॉम होम व ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईलची मागणी बाजारात तब्बल ७० टक्‍क्‍यांनी वाढली. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये मोबाईलच्या पाच ब्रॅंडची प्रतिमहिना एक लाख ७० हजार विक्री झाली आहे.

पिंपरी - लॉकडाउनमध्ये २२ मार्च ते १ मे पर्यंत मोबाईल दुकाने लॉक होती. त्यानंतर वर्क फ्रॉम होम व ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईलची मागणी बाजारात तब्बल ७० टक्‍क्‍यांनी वाढली. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये मोबाईलच्या पाच ब्रॅंडची प्रतिमहिना एक लाख ७० हजार विक्री झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनलॉकनंतर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत सर्वाधिक तीन लाख वीस हजारांवर मोबाईल पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विकले गेले आहेत. हे सर्व मोबाईल मध्यमवर्गीय कुटुंबांनी पाल्याच्या ऑनलाइन शिक्षणासाठी व वर्क फ्रॉम होमसाठी घेतले असल्याचे पुणे जिल्हा ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर वाघमोडे यांनी सांगितले.

बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर... 

पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड शहरात नोकरदार वर्ग मोठा आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या शहरात शिक्षणासाठी धडपड करून पालकांनी मुलांसाठी ऑनलाइन शिक्षणात उडी घेण्यासाठी मोबाईल खरेदी केले. मोबाईलवर अठरा टक्के जीएसटी आहे. दिवसाकाठी एका मोबाईल आउटलेटमधून तब्बल ५० ते ५२ मोबाईलची विक्री झाली आहे. जेमतेम कुटुंबांनीही सहा ते आठ हजार रुपये किमतीचे मोबाईल खरेदी केले आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबीयांनी पाल्याच्या शिक्षणासाठी १० ते १५ हजार रुपये किमतीचे मोबाईल खरेदी केले आहेत.

कोंढव्यात दारु पिण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातून तरुणाचा खून 

सप्टेंबर महिन्यात घटली मागणी 
लॉकडाउनमध्ये बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. त्यापाठोपाठ ऑनलाइन शिक्षणाचा अंदाज घेऊन पालकही रोडावले. मोबाईल नसलेल्या पाल्याची दखल घेणारा शिक्षक वर्ग व शाळाही उरल्या नाहीत. त्यामुळे मागणी चाळीस टक्‍क्‍यांवर येऊन ठेपली. दोन ते तीन टक्के नफा मिळत असल्याने ऑनलाइन मोबाईल खरेदी करण्याकडे बऱ्याच जणांचा कल दिसला. किरकोळ बिघाड झाल्याने जुने मोबाईल देऊन नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांची संख्याही मध्यम स्वरूपाची होती. 

आजी तुझ्या हातचं जेवायचंय म्हणून केलेला तो फोन ठरला शेवटचा
 
खर्चात काटकसर...
सध्या नागरिकांच्या खिशात घर चालण्याइतकाच पैसा उरला आहे. आरोग्यासाठी नागरिक पैसे राखून ठेवू लागले आहेत. गरजेपोटी मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आहे. नवीन टेक्‍नॉलॉजीने जन्म घेतला की दोन ते तीन महिन्यांकाठी मोबाईल बदलणारा एक वर्ग आहे. तो आता आर्थिक तंगीमुळे मोबाइल बदल नाही. 

ऑनलाइन शिक्षणासाठी असा हवा मोबाइल

  • रॅम कमीत कमी २ जीबी, इंटरनल मेमरी १६ जीबी 
  • बिलावर जीएसटी नंबर व रजिस्ट्रेशन नंबर आहे का?
  • स्टोअरेज ६४ जीबी 
  • बॅटरी तीन हजार मिलिअम 
  • बॉक्‍स सील आहे का? 
  • मेड इन इंडिया आहे का? 
  • बिल ग्राह्य आहे का? 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online education mobile sales skyrocketed in just two months