सेवानिवृत्त पोलिसांचा रंगला ऑनलाइन निरोप समारंभ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

शहर पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याचा मंगळवारी ऑनलाईन निरोप समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे ऑनलाईन माध्यमाद्वारे उपस्थित होते. यावेळी एक सहाय्यक पोलिस आयुक्त, तीन पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, तीस पोलिस कर्मचारी असे एकूण ३६ पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. 

पुणे : आत्तापर्यंत "ते" आपले शहर सुरक्षित ठेवण्यासाठी झटत होते, कधी ऊन, बघितले नाही की, मुसळधार पाऊस, ते दिवसरात्र सेवा करत होते. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांनी कोरोनाविरुद्ध ही खंबीरपणे लढा दिला, आज त्याच 36 लढवय्या पोलिसांच्या डोळ्यात अश्रु आणि ऋदयात अभिमान होता, कारण आज त्यांचा ऑनलाईन निरोप समारंभ होता ! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहर पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याचा मंगळवारी ऑनलाईन निरोप समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे ऑनलाईन माध्यमाद्वारे उपस्थित होते. यावेळी एक सहाय्यक पोलिस आयुक्त, तीन पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, तीस पोलिस कर्मचारी असे एकूण ३६ पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस आयुक्त डॉ.वेंकटेशम यांनी सेवानिवृत्त झालेल्या पोलिसांना निरोप देण्यासाठी दरमहिन्याला पोलिस आयुक्तलयात निरोप समारंभ घेण्यास सुरुवात केली होती. या कार्यक्रमासाठी पोलिसांच्या कुटुंबांना आमंत्रित केले जात होते. मात्र कोरोनामुळे हा कार्यक्रम बंद करण्यात आला होता. मंगळवारी जाहीर कार्यक्रमाऐवजी सेवानिवृत्त पोलिसांना ऑनलाइन पद्धतीने शुभेच्छा देण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने एकमेकांशी संवाद साधणाऱ्या अ‍ॅपचा वापर करण्यात आला. या उपक्रमात सेवानिवृत्त पोलीस तसेच त्यांच्या कुटुंबीयांना देखील सहभागी करून घेण्यात आले. 

पुणे : हवेलीत रुग्णांची संख्या पोहोचली 170 वर...

खडकी पोलीस ठाण्यातून निवृत्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत मिसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक चिपाडे, शिंदे, बिनतारी संदेश विभागातील दरडे, प्रशासकीय अधिकारी अकोसकर यांनी प्रातनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. पोलिस उपायुक्त वीरेंद्र मिश्र, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, मानव संशोधन विभागातील सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर उपस्थित होते. मिश्र यांनी आभाार प्रदर्शन केले.
पुण्यात अर्ध्या तासात कोरोना चाचणी; महापालिकेकडे एक लाख किट उपलब्ध 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Farewell Ceremony of Retired pune Police