पुणे : COEP संचालकांच्या फेक ईमेलद्वारे 51 लाखांची फसवणूक

online fraud of 51 lakh by fake email of COEP director
online fraud of 51 lakh by fake email of COEP director

पुणे : ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार थांबण्याची चिन्हे नसल्याची सद्यस्थिती आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालकांच्या ईमेलशी साधर्म्य असणारा बनावट ईमेल तयार करून त्याद्वारे महाविद्यालयाची तब्बल 51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ऑक्‍टोबर 2018 मध्ये घडली आहे. या घटनेसह अन्य तीन घटनांमध्ये तिघांना अकरा लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. 

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऑनलाईन फसवणुकप्रकरणी महाविद्यालयाचा कर्मचारी सचिन जाधव यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 ते 22 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीमध्ये घडला.


दांड्या मारणाऱ्या CBSC विद्यार्थ्यांचे 10 वी, 12 वीचे वर्ष धोक्‍यात?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालकांच्या इमेलशी साध्यर्म असणारा एक बनावट इमेल सायबर गुन्हेगारांनी तयार केला. त्यानंतर संबंधीत बनावट इमेल जाधव यांना पाठविण्यात आला. त्यानंतर जाधव यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांना सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी 51 लाख रुपये वेळोवेळी त्यांच्या खात्यात जमा केले. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे याबाबत फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे करीत आहेत. 

दुसऱ्या घटनेमध्ये नितीन कबीर (वय 50, रा. सिंहगड रस्ता) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कबीर हे भोसरीतील एका कंपनीत उपव्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. जुलै 2019 मध्ये कंपनीच्या कामासाठी फरिदाबाद येथे जायचे होते. तेथे राहण्यासाठी त्यांनी दिल्लीतील एका हॉटेलमधील खोलीची ऑनलाइन नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा हॉटेलच्या ग्राहक सेवा तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधला. तुम्ही जमा केलेली रक्कम 48 ते 72 तासात बँकेत जमा होईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्याचवेळी अनोळखी व्यक्तींनी कबीर यांना लिंक पाठविली. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या खात्यातील 99 हजार 980 रुपये आणि 10 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 

तर तिसऱ्या घटनेप्रकरणी वारजे येथील ऋषीकेश सोमासे (वय 22) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांना त्यांच्याकडील जुना मोबाईल विकायचा होता. त्यासाठी त्यांनी एका संकेतस्थळावर जुन्या मोबाइलची जाहीरात केली. त्यानंतर त्यांना एका व्यक्तीने संपर्क करून आपण लष्करात असल्याची बतावणी केली. सोमासे यांचा मोबाईल खरेदी करण्याचा बहाणा करुन त्यांच्या खात्यातील 15 हजार 300 रुपये काढून घेतले. 

दरम्यान, ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी पराग अहिरराव (वय , रा.34 कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अहिरराव यांचे कोंढवा परिसरामध्ये किराणा मालाचे दुकान आहे. त्यांना दूधपावडर खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांनी इंदूरमधील ओमसाई एंटरप्रायजेसच्या मालकांबरोबर संपर्क साधला. खरेदी व्यवहारापोटी अहिरराव यांनी ओमसाई एंटरप्रायजेसच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने नऊ लाख 88 हजार 771 रुपये जमा केले. त्यानंतर अहिरराव यांना दूध पावडर पाठविण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी संबंधीत व्यक्तींना फोन केला, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com