इन्स्टाग्रामवर झाली ओळख; म्हणाला, परदेशातून भेटवस्तू पाठवतो अन्...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

पुणे : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या व्यक्तीने परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाद्वारे येरवड्यात राहणाऱ्या महिलेला साडेअकरा लाख रुपयांचा गंडा घातला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित 32 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : चोरटा गेला 'एमएसईबी'च्या पट्ट्या चोरायला अन् बसला शॉक 
 

पुणे : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या व्यक्तीने परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाद्वारे येरवड्यात राहणाऱ्या महिलेला साडेअकरा लाख रुपयांचा गंडा घातला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित 32 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : चोरटा गेला 'एमएसईबी'च्या पट्ट्या चोरायला अन् बसला शॉक 
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची पाच महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर डेविल विल्यम्स असे नाव असलेल्या एकाबरोबर ओळख झाली होती. त्यानंतर महिला आणि विल्यम्स यांच्यातील संवाद वाढला. विल्यम्सने फिर्यादी यांना परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखविले होते. तक्रारदार महिला आमिषाला बळी पडली. त्यानंतर परदेशातून भेटवस्तू पाठविल्या असून सीमाशुल्क विभागाच्या ताब्यातून या वस्तू परत मिळवण्यासाठी काही रक्कम भरावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे बतावणी करून महिलेला बँक खात्यात वेळोवेळी पैसे भरण्यास सांगण्यात आले. महिलेने वेळोवेळी बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने 11 लाख 45 हजार 300 रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर फिर्यादी यांनी डेविल याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे परदेशातून पाठविण्यात आलेल्या भेटवस्तू न मिळाल्याने त्यांनी शहानिशा केला. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने नुकतीच फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख तपास करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बँकेत खाते उडण्याची बतावणी करून फसवले 
बँकेत खाते उघडण्याच्या बहाण्याने अज्ञाताने एकाची फसवणूक केली. भामट्याने तक्रारदार यांना फोन केला. एका बँकेतून बोलत असल्याचे सांगत बॅँकेत खाते उघडल्यास परतावा चांगला मिळेल, असे आमिष त्यांना दाखविले आले. त्यानंतर अज्ञाताने तक्रारदाराच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन एक लाख 75 हजारांची रोकड दुसऱ्या बँक खात्यात जमा केली. या बाबत तक्रारदाराने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले तपास करीत आहेत.

माळशेजचा पतंग महोत्सव अडकला वादाच्या भोवऱ्यात कारण.... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Fraud with a woman from pune by pretending to send gifts from abroad

टॅग्स
टॉपिकस