esakal | बारावीच्या ऑनलाइन होणाऱ्या पेपर्सचेही आता पुनर्मुल्यांकन, राज्य शिक्षण मंडळाने दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

exam

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेत काही विषयांची परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते.

बारावीच्या ऑनलाइन होणाऱ्या पेपर्सचेही आता पुनर्मुल्यांकन, राज्य शिक्षण मंडळाने दिली माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २५ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेत काही विषयांची परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या विषयांच्या उत्तरपत्रिकांचे  पुनर्मुल्यांकन यंदापासून करता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

लय भारी, कऱ्हेकाठी रंगलीये थ्रीडी रांगोळीतून "आठवणीतील वारी'

दरवर्षी बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत विहित शुल्कासह उपलब्ध करून देण्यात येते. त्यानंतर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीची मागणी करणारे विद्यार्थी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करतात. यासाठी ठराविक कालावधीची मुदत दिली जाते. यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणाऱ्या विषयांसाठी पुनर्मुल्यांकन करून देण्याची सुविधा देण्यात आली नव्हती. मात्र आता राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना ही सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा झालेल्या विषयांचे गुणांची पडताळणी करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. 
पडळकर यांच्याविरूद्ध बारामतीत गुन्हा दाखल

राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावी फेब्रूवारी-मार्च२०२० पासून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या विषयांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करता येणार आहे. सध्या बारावीच्या माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या दोन विषयांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाते. यंदा बारावीतील माहिती तंत्रज्ञान विषयासाठी एक लाख ३४ हजार ८१०, तर सामान्य ज्ञान विषयासाठी एक हजार ७५२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

निकालाची तारीख अद्याप नाही
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात दहावी-बारावीचा निकाल आज लागणार, उद्या लागणार या बाबतच्या खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक अशा मेसेजमुळे त्रासून गेले आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२०मध्ये घेण्यात आलेल्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाच्या वतीने अधिकृत ई-मेल, प्रसिद्धी माध्यमे आणि मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याची विद्यार्थी, पालक, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि संबंधितांनी नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.