विरोधी पक्षनेत्यांना कोरोनाचा संसर्ग; अजित पवारही एका बैठकीला होते सोबत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या आणि त्यांच्या पतींना कोरोनाची लागण झाल्याचे उघड होताच महापालिका वर्तुळात प्रचंड घबराट पसरली आहे.

पुणे : पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या आणि त्यांच्या पतींना कोरोनाची लागण झाल्याचे उघड होताच महापालिका वर्तुळात प्रचंड घबराट पसरली आहे.

- कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची तडकाफडकी बदली; बदलीचे कारण...!

महापालिकेतील सगळ्याच बैठकांना विरोधी पक्षनेत्या हजर राहिल्याने पदाधिकारी-अधिकारी आता पुन्हा चांगलेच धास्तावले आहेत. गंभीर म्हणजे मुंबईत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेतच्या बैठकीला या नेत्या उपस्थित होत्या.

विरोधी पक्षनेत्यांच्या तपासणीचा अहवाल येताच महापालिकेतील त्यांचे दालन "सील' करण्यात आले असून, गेल्या आठवडाभरात त्यांच्या दालनात उठबस करण्यापासून खासगी कक्षात चर्चेला आलेल्या नगरसेवक-पदाधिकाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. 

- 'मीटर रिडींग घेऊ द्या, नाहीतर...'; महावितरण देणार वीजग्राहकांना 'शॉक!'

दुसरीकडे, विरोधी पक्षनेत्या आणि त्यांच्या दालनात आलेल्या लोकप्रतिनधी आणि नागरिकांचा शोध घेण्याची जबाबदारी प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. मात्र, काहीजण संपर्कात नसल्याचे सांगून प्रशासनापुढच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

कोरोनाच्या साथील विरोधीपक्ष नेत्या आणि त्यांचे पती प्रभागातील गरजुंच्या संपर्कात जाऊन त्यांची मदत करीत होते. त्यादरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसू लागल्याने त्यांची तपासणी केली; तेव्हा त्यांचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला. त्यानंतर दोघांवर उपचार सुरू झाले आणि दुसरीकडे त्यांच्या संपर्कात म्हणजे, "क्‍लोज कॉन्टॅक्‍ट'मधील लोकांना तपासणी करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ९७ टक्के एफआरपी रक्कम कारखान्यांनी केली अदा!

दरम्यान, रस्त्यांच्या रुंदीकरणावरून गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे-मुंबईत बैठका होत आहेत.या दोन्ही बैठकांसह आढावा बैठकांनाही विरोधी पक्षनेत्या हजर होत्या. या बैठकांना त्यांचे पतीही हजेरी लावत असतात. त्यानंतर महापालिकेतील बहुतांशी बैठका आणि छोटेखानी कार्यक्रमांत दिसत होत्या. त्यामुळे गेल्या दहा दिवसांतील बैठकांना उपस्थितीत राहिलेल्या सर्वच पदाधिकारी-अधिकारी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition leader in Pune Municipal Corporation infected with corona