आळंदी नगराध्यक्षांच्या पतीच्या हस्तक्षेपप्रकरणी कार्यवाहीचे आदेश

विलास काटे
Thursday, 3 December 2020

आळंदी पालिका नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांचे पति अशोक कांबळे यांचा पालिकेच्या कामकाजात वारंवार होणारा हस्तक्षेप व ढवळाढवळ रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर आणि मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना त्वरित कार्यवाही करून अहवाल पाठविण्याचा आदेश दिला.

आळंदी : आळंदी पालिका नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांचे पति अशोक कांबळे यांचा पालिकेच्या कामकाजात वारंवार होणारा हस्तक्षेप व ढवळाढवळ रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर आणि मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना त्वरित कार्यवाही करून अहवाल पाठविण्याचा आदेश दिला.

कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू

याबाबत खेड प्रांताधिकारी कार्यालयाने तक्रारदारांच्या तक्रारीतील तथ्य तपासून चौकशी अहवाल २८ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी देशमुख यांनी आजची कार्यवाही केली. आळंदी पालिकेत नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर या भाजपाकडून लोकमतातून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. नगराध्यक्षपद अनुसुचित जातीसाठी आरक्षित होते. मात्र नगराध्यक्षपदाचा पदाभार सांभाळल्यानंतर त्यांचे पति अशोक कांबळे हे वारंवार पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत.नागरिकांना अडवून कशासाठी आलात विचारणा करत.आवकजावक विभागात पत्रव्यवहार तपासणी करत.तसेच सभेचे कामकाज,चर्चा आणि प्रशासकिय बैठकांनाही उपस्थीती दाखवित. कर्मचारी,अधिकारी यांच्याशी वाद घालून उपमर्द करत.

एकंदर नगराध्यक्षांपेक्षा त्याचे पतिच कोणताही अधिकार नसताना प्रशासकिय कामकाजात ढवळाढवळ करत होते. अखेर नागरिकांनी कंटाळून जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी स्तरावर तक्रारी केल्या होत्या. नागरिकांचीही वाढत्या हस्तक्षेपामुळे कुचंबणा होत होती. आता जिल्हाधिका-यांनी हस्तक्षेप थांबविण्यासाठी आदेश दिल्याने पालिका नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी पुढील कार्यवाही काय करतात याकडे आळंदीकरांचे लक्ष लागले आहे.

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

याबाबत मुख्याधिकारी अंकूश जाधव यांनी सांगितले, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशावर कार्यवाही करून आज अशोक कांबळे यांना पत्र देवून हस्तक्षेप न करण्याबाबत सुचित केले जाईल.

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order of action in case of interference of Alandi mayor's husband