पुणेकरांनो, दीड महिन्यापासून बंद असलेले मार्केट यार्डातील इतर विभाग सुरू होणार पण...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

बाजार समितीकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना

une-news">पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी, फळे, कांदा-बटाटा, केळी, फुले आणि पान विभाग गेल्या दीड महिन्यापासून बंद आहेत. बंद असलेले हे विभाग सुरू करण्यासाठी बाजार समितीने अडते, हमाल, कामगार, टेम्पो चालकांची मंगळवारी बैठक बोलविली आहे. या बैठकीत बाजारातील बंद विभाग सुरू करण्याबाबत खबरदारी व उपाय-योजनाबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच मार्केट यार्डातील बंद असलेले सर्व विभागही सुरू होणार असल्याचे संकेत प्रशासक बी. जे. देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले.

कोथरुडकरांनो सावधान! कोरोनाचा वाढतोयं धोका...

देशमुख म्हणाले, गूळ-भुसार बाजारात काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागणं झाली होती. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मागील मंगळवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला होता. मात्र भुसार विभागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच विविध उपाय योजना करून येत्या सोमवारपासून बाजार सुरू होणार आहे. व्यापारी, हमाल, खरेदीदारांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. बाजारात येणाऱ्या ग्राहकांत 3 ते 4 फुटांचे अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे. बाजारात धान्याचे कीट तयार करण्यास बंदी. आवक झालेली वाहने सायंकाळी 5 पर्यंत खाली करून घ्यावी.

Video : कोरोनानेनंतर मरू पण त्याआधी "या' जेवणाने... 

सायंकाळी 6 नंतर बाजारात थांबण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरातील बाधित क्षेत्रातील नागरिकांना बाजारात बंदी असणार आहे. भुसार मालाची दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उघडी असणार आहेत. सुकामेवा व पुरक दुकाने सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत उघडण्यात येतील. शेतीमालाची आवक बंद असणार आहे. बाजारात रोज 100 वाहनांनाच परवानगी दिली जाणार आहे. गेट क्रमांक पाचमधून वाहनांना प्रवेश दिला जाईल. बाहेर जाणार्‍या वाहनांना इतर गेटचा वापर करता येणार आहे. भुसार विभागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच बाजार सुरू झाल्यानंतर वाहनांची तसेच खरेदीदारांनी गर्दी टाळण्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. कोरोना बाधित क्षेत्रातील खरेदीदार आणि कामगारांना बाजारात प्रवेश बंदी असणार आहे. दुकानदारांनी बाधित क्षेत्रातील कामगारांना दुकानात घेतल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: other sections of the market yard which have been closed for a month and a half will be reopened