Leopard : ओतूर परीसरात बिबट्याची दहशत; केली कुत्र्याची शिकार

ओतूर व परीसरातील गावे बिबट प्रवण क्षेत्र म्हणून या आधीच जाहिर करण्यात आली आहे. या परीसरात बिबट्याचे दर्शन नित्याचेच झाले आहे.
Leopard attack on Dog
Leopard attack on Dogsakal

ओतूर - ओतूर, ता. जुन्नर व परीसरात बिबट्याची दहशत वाढत असून वनविभागाच्या कारभारात बाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ओतूर व परीसरातील गावे बिबट प्रवण क्षेत्र म्हणून या आधीच जाहिर करण्यात आली आहे. या परीसरात बिबट्याचे दर्शन नित्याचेच झाले आहे. मात्र नेहमी सारणी, अहिनवेवाडी मार्ग, ओतूर, ब्राह्मणवाडा मार्ग, फापाळे शिवार, गाढवपट, घुले पट तसेच धोलवड पारधी या व इतर परीसरात बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना नेहमीच होत असून पाळीव प्राणी भटकी कुत्री याच बरोबर नागरिकांवर हल्ल्याच्या ही गंभीर घटना घडल्या आहेत.

नेहमी घटना घडली की, वनविभागाकडून त्यावेळी जनजागृती व रात्रीची गस्त तसेच इतर कार्यक्रम तेवढ्या पुरते राबवले जातात. व घटनेचे गांभीर्य संपले की हे उपाय ही थंड पडतात. तरी वनविभागाकडून नियमीत बिबट विषयक जनजागृती मोहीम राबवावी. तसेच विज वितरण कंपनीकडून बिबट प्रवण क्षेत्रात शेतीसाठी दिवसा विज मिळण्यासाठी प्रयत्न करावे. बिबट्याचे वारंवार हल्ले होणाऱ्या मार्गावर स्ट्रीट लाईट नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने निधी उपलब्ध करून देऊन लावावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ओतूर, अहिनवेवाडी, सारणी मार्गावर गुरूवारी रात्री नऊ वाजे दरम्यान प्रविण डुंबरे वडीलांन बरोबर दुचाकीवर जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप टाकली. गाडी पुढे गेली मात्र, बिबट्याचा पंजा लक्ष्मण डुंबरे यांच्या हातावर लागल्याने ते जखमी झाले. त्यांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून बिबट प्रतिबंधक लस देण्यासाठी पुढे पाठवण्यात आले.

तसेच ओतूर शहरात तांबेमळा रोडवरील ओम साई सोसायटीत पंकज भाटे यांचे रो हाऊसचे समोर पार्किंग एरीयामध्ये बिबट्याने गुरूवारी पहाटे ३.१५ दरम्यान कुत्र्याला पकडून नेले. याआधी पण २ वेळा या भागातून दोन कुत्र्यांची शिकार बिबट्याने केलेली आहे.

तरी वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच ओतूर ग्रामपंचायतने ओतूर शहरात व लगतच्या परीसरात फिरणारी भटकी कुत्री व डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ही नागरिकांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com