पुण्यात कोरोनामुक्तांनी ओलांडला लाखाचा आकडा!

गजेंद्र बडे 
Thursday, 20 August 2020

कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही मंगळवारी (ता.१८) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता.१९) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांचा बुधवारी (ता.१९) एक लाखांचा आकडा पार झाला. आतापर्यंत पुणे शहरातील सर्वाधिक ६० हजार ९६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, बुधवारी दिवसभरात २ हजार ७२४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे  शहरातील १ हजार २२१ जणांचा समावेश आहे. 

दरम्यान, दिवसभरात बुधवारी तब्बल ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये ८५३, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात ४९५, नगरपालिका क्षेत्रात १२२ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ४३ नवे रुग्ण सापडले आहेत.

'पीएमपी'साठी महापौर मोहोळ घेणार पुढाकार; बससेवा लवकर सुरू होण्याची शक्यता!

दिवसभरात मृत्यू झालेल्या एकूण ९० कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ३५, पिंपरी-चिंचवडमधील ३४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १४, नगरपालिका क्षेत्रातील ६ आणि  कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एका रुग्ण आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही मंगळवारी (ता.१८) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता.१९) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

पुणे जिल्ह्यातील बुधवार अखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ३२ हजार २९३, कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७१२, तर रुग्णांच्या मृत्यूची संख्या ३ हजार २९० झाली आहे. मृत्यू  झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ८९ रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी दिवसभरात १ हजार ५८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कारण ऐकून व्हाल हैराण​

आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ६० हजार ९६३, पिंपरी-चिंचवडमधील २६ हजार ८९०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८ हजार १८४, नगरपालिका क्षेत्रातील २ हजार ४१२ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रातील २ हजार २६३ रुग्णांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over one lakh corona free patients in Pune district