महाविकास आघाडीचा भाजपला 'दे धक्का', पदवीधरमधून अरूण लाड विजयी

 Padvidhar election result 2020,  BJP,  Maha Vikas Aghadi, Arun Lad
Padvidhar election result 2020, BJP, Maha Vikas Aghadi, Arun Lad

पुणे : राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनविलेली आणि मतदानाचा टक्का वाढल्यामुळे चर्चेत आलेल्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीने अखेर बाजी मारली. पदवीधर मतदार संघात आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांनी पहिल्या पसंतीक्रमाच्या मते मते घेत नवा विक्रम घडविला. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा 48 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. 

पदवीधर मतदारसंघासाठी गुरुवारी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे मतमोजणी प्रक्रीया गुरूवारी सकाळी आठ वाजता सुरु झाली. या मतदार संघातून 62 उमेदवार रिंगणार होते. तर पाचही जिल्ह्यात मिळून यंदा विक्रमी मतदान झाले होते. परिणामी विजयासाठी मतदानाचा कोटा पूर्ण करण्यासाठी किमान एक लाखाहून अधिक मते घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. सकाळी सुरू झालेली मोजणी तरी पहिल्या टप्प्यात वैध आणि अवैध मतपत्रिकांच्या विभागणीचे काम सुरु मध्यरात्री उशीरापर्यंत सुरू होते. परंतु, मतदान केंद्र अधिकाऱ्यानी विभागणी करतानाच प्रथम पसंती दिलेल्या मतपत्रिकांची स्वतंत्र विभागणी केली होती. त्यानुसार पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे लाड आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. 

पदवीधर मतदार संघात एकूण मतांपैकी 19 हजार 428 मते अवैध ठरली. तर 2 लाख 28 हजार 259 मते वैध ठरली. त्यामुळे विजयासाठी 1 लाख 14 हजार 131 हा कोटा निश्‍चित करण्यात आला. त्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्याच फेरीत लाड यांनी 1 लाख 22 हजार हजाराहून अधिक मते मिळाली. तर लाड यांचे विरोधक भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली. त्यामुळे लाड हे 48 हजार 824 मतधिक्‍यांने विजयी झाले. 

रिंगणात उमेदवारांची संख्या सर्वाधिक असून देखील लाड यांना सरळ विजय मिळाला. विजयासाठी आवश्‍यक त्या मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे पसंतीक्रमांच्या मतांची मोजणी करण्याची गरज पडली नाही. यापूर्वी याच मतदार संघात झालेल्या निवडणुकीत पहिल्या पसंतीक्रमाने आणि तेही जवलपास विक्रमी मतांनी विजयी होण्याचा प्रथमच मान लाड यांना मिळाला आहे. 

एकूण मतदान- 2 लाख 47 हजार 687 
अवैध मतदान -19 हजार 428 
-वैध मतदान - 2 लाख 28 हजार 259 
-विजयासाठी आवश्‍यक मतांचा कोटा - 1 लाख 14 हजार 130  

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते 
-अरूण लाड (महाविकास आघाडी) -
1 लाख 22 हजार 145 
-संग्राम देशमुख (भाजप) - 73 हजार 321 
-रूपाली पाटील (मनसे) - 6 हजार 713 
-डॉ श्रीमंत कोकाटे (अपक्ष)- 6 हजार 572) 
-प्रा. शरद पाटील ( जनता दल-सेक्‍यूलर)- 4 हजार 259 
-सोमनाथ साळुंके (वंचित बहुजन आघाडी)- 3 हजार 139 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीकडून अरूण लाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्याचा नावाचे अरूण (अण्णा) लाड यांच्या नावाचे आणखी एक उमेदवार रिंगणात होते. या नामसाध्यर्म्यांमुळे अपक्ष उमेदवार असलेल्या अरूण (अण्णा) लाड यांना 2 हजार 554 इतके मते मिळाली. 

(संपादन : सागर डी. शेलार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com