छेडछाड केल्याच्या व्हायरल मेसेजमुळे खडकवासला परिसरात दहशत

Panic Khadakwasla area due to viral message of Tampering
Panic Khadakwasla area due to viral message of Tampering
Updated on

उत्तमनगर(पुणे) : ''खडकवासला, शिवणे, सिंहगड रस्ता परिसरात महिला मुलींच्या छेडछाडीचे संदर्भात सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असून त्याबाबतीत आम्ही स्थानिक पातळीवर चौकशी करत आहे. याबाबत अद्याप तक्रार कोणी दिलेली नाही किंवा पोलिस ठाण्यात याबाबत कसला फोन देखील आला नाही.'' ,अशी माहिती उत्तमनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पंधरकर यांनी सांगितले. 

असा आहे व्हायरल मेसेज
खडकवासला धारण परिसरात निर्मनुष्य ठिकाणी गुंड दारूच्या पार्ट्या करून नंतर सिंहगड रोड एनडीए  रोडने जाता येता महिला आणि मुलींना छेडत आहेत. पती पत्नी एकत्र असतील तर पतीच्या अंगावर थुंकून मुद्दाम भांडण करण्यास भाग पाडून पत्नी वर लागत करण्याचा प्रयत्न करत आहेत. काळ १३ डिसेंबर २०१९ रोजी एनडीए रोडवर साधारण रात्री ८ ते ९ दरम्यान राजर्षी शाहू बँके समोर अशीच घटना घडली आहे. पोलिसांना फोने करेपर्यंत गुंड पळून गेले. तरी आपापल्या नातेवाईकांना सावध करा कि, संध्याकाळी कुठल्याही ऑटोमध्ये बसू नये तसेच कुणी अंगावर थुंकल्यास किंवा घाण टाकल्यास भांडत बसू नये, ताबडतोब आपल्या घरी यावे. महिला आणि खास करून मुलींनी या परिसरात संध्याकाळी फिरू नये. हैदराबाद घटनेसारखी पुनर्वत्ती होऊ शकते. हे गुंड मुलींना ऑटोत बसून अपहरण करू शकतात. त्यामुळे सिंहगड आणि एनडीएरोड वरील लोकांनी सावध राहावे. तसेच आपल्या नातेवाईकांना देखील कळवावे. असा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यासंदर्भात पोलीस निरीक्षक पंधरकर म्हणाले, "अशाप्रकारचा मेसेज व्हायरल झाल्याचे आम्हाला आज सकाळी कळाले त्यानंतर, आम्ही या परिसरातील रस्त्यावरील पोलिस गस्त वाढविली आहे. याबाबत आमची चौकशी सुरू आहे. माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु या प्रकरणी अद्याप कोणीही व्यक्तीने तक्रार अथवा फोन करून असा छेडछाड केल्याची तक्रार किंवा माहिती आम्हाला मिळाली नाही. कोणीही व्यक्ती पोलिसांच्या पर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे, हा प्रकार घडला की फक्त सोशल मीडियावर मेसेज व्हायरल आहे. पोलिस यंत्रणेला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे का, याचा देखील तपास केला जात आहे. घटना घडली त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.''

''या प्रकार ज्या व्यक्तीसह छेडछाड झाली आहे त्याने त्याबद्दल तक्रार द्यावी.  आम्ही तक्रार देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून आणि त्रास देणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात माहिती दिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.'', असे पंधरकर यांनी सांगितले.

#TuesdayMotivation : उसवलेल्या आयुष्याला हिमतीचा टाका!  (व्हिडिओ)
 
हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले की, ''खडकवासला परिसराचा धरणाच्या परिसरात रस्ता निर्मनुष्य नाही. रस्त्याच्या आजूबाजूला असे प्रकार घडत असतील परंतु, आम्हाला अशा गोष्टी निदर्शनास आलेल्या आल्यावर आम्ही तातडीने त्यांच्यावर कारवाई करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com