

The protesters demanded the resignation of Union Education Minister Dharmendra Pradhan and called for a transparent examination system.
Sakal
पुणे : ‘भारत माता की जय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘जय भीम’ ‘तानाशाही नहीं चलेगी’, ‘धर्मेंद्र प्रधान इस्तिफा दो’... अशा घोषणांनी रविवारी सायंकाळी जंगली महाराज रस्ता परिसर दणाणून गेला. पेपरफुटी, शिक्षणाचे खासगीकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि ‘कॉकरोज जनता पार्टी’ यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात विद्यार्थी, युवक, पालक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले.