

Forest officials inspect the area in Pargaon after a woman survived a leopard attack due to her sweater.
Sakal
-सुदाम बिडकर
पारगाव : पारगाव (ता. आंबेगाव) येथील चिंचगाई मळा येथे काल बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान अश्विनी शिवाजी ढोबळे ( वय -29 वर्ष) या महिलेवर बिबट्याने झडप मारली परंतु सुदैवाने अंगातील स्वेटर मुळे कोणतीही जखम झाली नसली तरी घाबरून अश्विनी ढोबळे या बेशुद्ध पडल्या त्यांना पारगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.