तुळशीबागेत होणार आता ऑनलाइन बुकींगद्वारे पार्किंग

तुळशीबागेत खरेदीला जायचे आहे, पण ग्राहकाला सर्वात आधी प्रश्‍न पडतो तोग'गाडी लावायला जागा कुठे मिळणार?’ या समस्येवर आता तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनीच उत्तर शोधून काढले.
Tulshibag
TulshibagSakal

पुणे - तुळशीबागेत खरेदीला जायचे आहे, पण ग्राहकाला सर्वात आधी प्रश्‍न पडतो तोग'गाडी लावायला जागा कुठे मिळणार?’ या समस्येवर आता तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनीच उत्तर शोधून काढले. महालक्ष्मी मेट्रो सोसायटीचे २१५ वाहने लावण्याची क्षमता असलेले पार्किंग नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. सोसायटीत गाडी लावायची, त्याचे पैसे व्यापारी देणार आणि पुणेकरांनी बिनधास्त खरेदी करायची असा हा उपक्रम आहे.

या योजनेचे उद्घाटन नुकतेच महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी केले आहे. गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पंडित, महालक्ष्मी मेट्रो सोसायटीचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

Tulshibag
बुधवारपासून महाविद्यालये होणार सुरू

आनंद जोशी यांनी'पार्किंग हब’ नावाचे अॅप विकसित केले असून, च्या साह्याने तुळशीबाग व्यापारी असोसिएशनने नागरिकांना घरातूनच ऑनलाइन पार्किंगचा स्लॉट उपलब्ध करून दिले आहे. जोगेश्‍वरी गल्लीतील महालक्ष्मी मेट्रो या सोसायटीची पार्किंग या ॲपद्वारे जोडली गेली असून, या ठिकाणी २०० दुचाकी व १५ कार पार्क करण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी इलेक्ट्रीक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशनची सुविधाही उपलब्ध आहे. याचप्रमाणे मध्यवर्ती बाजारपेठेतील सोसायट्यांचे पार्किंग, शाळांचे मैदाने उपलब्ध करण्यासाठी व्यवस्थापनाशी चर्चा सुरू आहे. यातून सोसायट्यांना उत्पन्नाचे साधन मिळणार आहे. भविष्यात गणपती चौक लक्ष्मी रोड व्यापारी असोसिएशन, शनिपार असोसिएशन, स्टेशनरी कटलरी ॲण्ड जनरल मर्चंट असोसिएशन, अप्पा बळवंत चौक पुस्तक विक्रेते संघटना, रविवार पेठ कापडगंज, बोहरे आळी व्यापारी असोसिएशन या व्यापारी संघटनांशी चर्चा करुण त्यांनाही या योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे. तसेच बाजारपेठेतील महापालिकेसह इतर खासगी पार्किंगच्या ठिकाणावरून पुण्यदशम बससेवा सुरु करावी, त्यामुळे ग्राहक गाडी लावून बाजारपेठेत बसने फिरू शकतात अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

‘तुळशीबागेत येणाऱ्या ग्राहकांना पार्किंगची सुविधा मिळावी यासाठी ही योजना राबविली आहे. यातून आमचा व्यापार देखील वाढेल. मध्यवर्ती भागात अशाप्रकारे पार्किंग उपलब्ध व्हावेत यासाठीही आमचा प्रयत्न आहे.हे पार्किंग पुण्यदशम बससेवेशी जोडले गेले तर ग्राहकांना गाडी लावून बाजारपेठेत फिरता येईल.’’

- नितीन पंडित, अध्यक्ष, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com