esakal | लोकसभेत ठेच बसलेला पार्थ आता ही निवडणूक लढणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Parth pawar

पवारांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणे सहज शक्य आहे. पार्थ यांनी थेट मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली होती. त्यांना त्यात अपयश आले. आता या घरच्या मतदारसंघातून राजकीय यश मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील असणार की थेट आमदार, खासदार होण्याचे त्यांचे लक्ष्य आहे, हे येत्या काही दिवसांत कळेल.

लोकसभेत ठेच बसलेला पार्थ आता ही निवडणूक लढणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ हे आपली पुढील राजकीय इनिंग हे जिल्हा परिषदेपासून सुरू करणार का, याची आता उत्सुकता आहे. कारण रोहित पवार हे आमदार झाल्यानंतर त्यांचा पुणे जिल्ह्यातील शिर्सुफळ-गुणवडी हा मतदारसंघ रिक्त झाला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पवारांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणे सहज शक्य आहे. पार्थ यांनी थेट मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली होती. त्यांना त्यात अपयश आले. आता या घरच्या मतदारसंघातून राजकीय यश मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील असणार की थेट आमदार, खासदार होण्याचे त्यांचे लक्ष्य आहे, हे येत्या काही दिवसांत कळेल. पार्थ यांच्याशिवाय पवार कुटुंबातील आणखी कोणी तरुण सदस्य राजकाणात या निमित्ताने उतरणार का, हे पण कळू शकेल.

Exclusive : शरद पवारांनी भेटीदरम्यान मोदींना दिले पत्र; पाहा...

खुद्द अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात छत्रपती साखर कारखान्याचे संचालक म्हणून केली होती. त्यानंतर ते बारामतीतून खासदार झाले. रोहित यांनी नियोजनबद्ध तयारी करत राजकीय कारकिर्द दमदारपणे सुरू केली आहे. तोच कित्ता गिरविण्याची संधी पार्थ यांना या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून एक लाख साठ हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत.

संजय राऊतांना आज आठवली वाजपेयींची कविता; काय आहे पाहा...

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांमधून आमदार झालेल्यांच्या झेडपी सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नव्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात पोटनिवडणूक घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे.आमदार झालेल्या सदस्याचे नाव राजपत्रात प्रसिद्ध होताच, त्यांचे झेडपी सदस्यत्व आपोआप संपुष्टात येते. त्यानंतर ही जागा रिक्त होते. या नियमानुसार रोहित पवार यांच्या जिल्हा परिषद गटाची जागा सध्या रिक्त झालेली आहे.

loading image