डेक्‍कन क्‍वीनमध्येच हार्ट अॅटकने प्रवाशाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

बईला जाण्यासाठी जैन रेल्वेत डी-1 बोगीमध्ये 30 क्रमांकाच्या आसनावर बसले. काही क्षणाताच ते खाली कोसळले. बोगीमधील डॉ. निर्मला केस्टल आणि आणखी एक डॉक्‍टर होते. त्यांनी तपासणी केली, जैन यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याचे दिसून आले.

पुणे : डेक्कन क्वीनमधील प्रवाशाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍यामुळे आल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना लोणावळा स्थानकादरम्यान मंगळवारी सकाळी घडली.
 

lay.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en" target="_blank">ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बहिरूलाल मोतीलाल जैन (वय 50, रा. तळेगाव) यांचा मृत्यू झाला. या दरम्यान रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन क्वीन सकाळी आठ वाजता लोणावळा स्थानकावर पोचते. मुंबईला जाण्यासाठी जैन रेल्वेत डी-1 बोगीमध्ये 30 क्रमांकाच्या आसनावर बसले. काही क्षणाताच ते खाली कोसळले. बोगीमधील डॉ. निर्मला केस्टल आणि आणखी एक डॉक्‍टर होते. त्यांनी तपासणी केली, जैन यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याचे दिसून आले. काही प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार खंडाळा स्थानकावर रेल्वे थांबवून जैन यांना रुग्णालयात नेले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेबाबत लोणावळा रेल्वे पोलिस तपास करीत आहेत. 

JNU Attack:जेएनयूच्या आंदोलनात उतरली दीपिका; जयभीमच्या घोषणा सुरू असतानाच आगमन

''महत्त्वाची स्थानके तसेच लोणावळ्यासारख्या स्थानकांवर एक डॉक्‍टर नियुक्त असणे गरजेचे आहे. अनेकदा रेल्वेतून रुग्ण रुग्णालयापर्यंत जाताना दगावतात. त्यामुळे स्थानकांवरही आपत्तकालीन वैद्यकीय व्यवस्थेची गरज आहे.''
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी गृप 

कांदा उतरला; मात्र खाद्यपदार्थ भडकलेलेच 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passenger died due to heart attack in Deccan Queen