Corona Virus : विमानात प्रवासी शिंकला अन्.....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

पुण्यात एअर एशियाच्या विमानातील प्रवाशी शिंकल्याने खबरदारी म्हणन वैमानिक विमानातून बाहेर पडला. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानातील इतर कर्मचाऱयांनी 'त्या' प्रवाशाला समोरील दाराने बाहेर काढण्यात आले आणि इतर प्रवाशांना मागच्या दाराने बाहेर काढण्यात आले आहे.

पुणे :  विमान उडण्यासाठी सज्ज होते. सर्व प्रवासी विमानात आपल्या जागेवर  बसले होते अन् तेवढ्यात विमानाच्या पहिल्या रांगेतील प्रवाशांने शिंकण्यास सुरवात केली. त्याला सर्दी झाली होती. हा प्रकार पाहून विमानातील कर्मचारी घाबरले. विमानाच्या पायलट एमरजन्सी एक्सीटमधून बाहेर पडला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

कोरोना व्हायरसची सारे जगात दहशत पसरली आहे. यूरोप, चीन, अमेरीका, इटलीत  हजारो लाखो लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर, भारतात कोरोना बाधितांची संख्या ३९५ वर पोहचली आहे तर, महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या ८९ वर गेली आहे.  पुण्यात एकून रुग्णांची संख्या २९ वर गेली आहे. त्यामुळे सगळीकडेच काळजी घेतली जात आहे

 

CoronaVirus : पुण्यात काही 'होम क्वारंटाईन' नागरिक बेपत्ता 

दरम्यान पुण्यात एअर एशियाच्या विमानातील प्रवाशी शिंकल्याने खबरदारी म्हणन वैमानिक विमानातून बाहेर पडला. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानातील इतर कर्मचाऱयांनी 'त्या' प्रवाशाला समोरील दाराने बाहेर काढण्यात आले आणि इतर प्रवाशांना मागच्या दाराने बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रवाशाला स्क्रिनिंग करण्यात आली. दिलसादायक बाब म्हणजे  सर्व प्रवाशांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. दरम्यान, काही वेळी विमानातील कर्मचाऱ्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले. त्यानंतर संपुर्ण विमानाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. 

Coronavirus : आतापर्यंत पुण्यात तब्बल एवढ्या जणांचे ‘होम क्वारंटाइन’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passenger Sneeze in Plane In Pune