Coronavirus: युरोप,दुबईतून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus: युरोप,दुबईतून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी होणार

पुण्यातील कोरोनाची साथी आटोक्‍यात येत असतानाच ब्रिटनमध्ये या आजाराचा नवा विषाणू आढळून आला आहे.सर्व पातळ्यांवर काळजी घेण्यात येत आहे.त्यातून युरोप व दुबईहून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यात येणार आहे.

Coronavirus: युरोप,दुबईतून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी होणार

पुणे- ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडल्यानंतर पुण्यातही उपाययोजना आखण्यात येत आहेत. युरोप आणि दुबईतून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी होणार असून, त्यासाठी ‘आरटीपीसीआर टेस्ट’ बंधनकारक असेल. त्याशिवाय प्रत्येक प्रवाशाला ७ दिवस हॉटेल आणि ७ दिवस घरीच विलग (क्वॉरंटाइन) राहावे लागणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी मंगळवारी आदेश काढला.

पुण्यातील कोरोनाची साथी आटोक्‍यात येत असतानाच ब्रिटनमध्ये या आजाराचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे सर्व पातळ्यांवर काळजी घेण्यात येत आहे. त्यातून युरोप आणि दुबईहून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यात येणार आहे. पुणे विमानतळावर प्रवाशांच्या कोरोना चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. चाचणीचा अहवाल नसलेल्यांची लगेचच चाचणी केली जाणार असून, कोरोनाची लागण झालेल्यांना महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात दाखल केले जाईल. विमानतळावरून प्रवाशांना हॉटेलपर्यंत नेण्यासाठी ‘पीएमपी’ची सोय केली आहे. त्याआधी संबंधित व्यक्तीचे पासपोर्ट ताब्यात घेण्यात येणार आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये लंडनला गेलेल्या नागरिकांनीही विलग राहावे, अशी सूचना  करण्यात आली आहे.

शहीद जवान सुजित किर्दत, नागनाथ लोभे यांना पुणे विमानतळावर लष्कराकडून सलामी

भारतात अद्याप नवा संसर्ग नाही
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर भारत सरकार देखील सावध झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या नव्या कोरोनाबाबतचे मानक दिशानिर्देश (एसओपी) आज जारी केले. कोरोनाचा हा नवा अवतार अद्याप देशामध्ये आढळून आला नसल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये, असे सरकारने स्पष्ट केले. ब्रिटनमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची व कर्मचाऱ्यांची विमानतळावरच कोरोना आरटीपीसीआर चाचणी करून त्यांचे विलगीकरण करण्यात येईल.

पुण्यात आलेला गवा कसा गेला, वाचा सविस्तर

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top