पिंपरीत बसथांब्यावर कोसळले झाड: प्रवासी जखमी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

डॉ. आंबेडकर चौकातून पिंपरीगावाकडे जाण्याऱ्या मार्गावर पीएमपीचा बसथांबा आहे. या थांब्यालगतच एका कंपनीची सिमाभिंत असून सिमाभिंतीच्या आत असलेले एक मोठे झाड अचानक कोसळले. हे झाड बस थांब्यावर पडल्याने येथील प्रवासी जखमी झाले. यामध्ये तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे

पिंपरी : बसथांब्याशेजारील झाड कोसळल्याने थांब्यावरील प्रवासी जखमी झाल्याची घटना पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी (ता.8) दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली. यामध्ये तीन ते चार विद्यार्थीनींचा समावेश आहे. 

सात वाजता उठायचं नाही, कामाला लागायचं; अजित पवारांचा आव्हाडांना टोला

डॉ. आंबेडकर चौकातून पिंपरीगावाकडे जाण्याऱ्या मार्गावर पीएमपीचा बसथांबा आहे. या थांब्यालगतच एका कंपनीची सिमाभिंत असून सिमाभिंतीच्या आत असलेले एक मोठे झाड अचानक कोसळले. हे झाड बस थांब्यावर पडल्याने येथील प्रवासी जखमी झाले. यामध्ये तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे.

पुण्यातील चुकलेल्या उड्डाणपुलांचं करायचं काय? अजित पवार म्हणाले...

जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. शाळा, महाविद्यालय सुटण्याची वेळ असल्याने थांब्यावर गर्दी होती. या घटनेमुळे रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती. यामध्ये एका वाहनाचेही नुकसान झाले.

अप्पर इंदिरानगरमध्ये सिलेंडरचा स्फोट; एकजण जखमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passengers were injured when a tree fell on a bus stop in pimpri