esakal | वनस्पतीवर आधारित चूर्णाला पेटंट
sakal

बोलून बातमी शोधा

Ayurved

वनस्पतीवर आधारित चूर्णाला पेटंट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘हीलिंग हँड्स हर्ब्स प्रायव्हेट लिमिटेड’ व ‘हीलिंग हँड्स संशोधन आणि विकास विभाग’ने जगातील पहिले वनस्पतीवर (Plant) आधारित चूर्ण तयार केले आहे. त्याचे पेटंट (Patent) मिळविण्यात हीलिंग हँड्स हर्बला यश मिळाले.

केंद्र सरकारच्या ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिया पेटंट्स डिझाईन ट्रेड मार्क्स जिओग्राफिकल इंडिकेशन’ या विभागातर्फे हे पेटंट देण्यात आले. डॉ. गजानन भागवत आणि हीलिंग हँड्स हर्ब्स प्रायव्हेट लिमिटेड व हीलिंग क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ. अश्विन पोरवाल यांनी यासाठी मार्गदर्शन केले. या पेटंटसाठी २०१४ पासून प्रयत्न सुरू होते. त्यात गेल्या तीन वर्षांपासून त्याचा ‘क्लिनिकल स्टडी’ नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

हेही वाचा: गर्दी टाळा, ऑनलाईन दर्शनालाच प्राधान्य द्या - डॉ.रविंद्र शिसवे

डॉ. पोरवाल म्हणाले, ‘हे विरेचक दोन प्रकारांत आहेत. ‘कॉन्स्टॅक’ सौम्य स्वरूपाच्या बद्धकोष्ठतेसाठी आणि दुसरे ‘कॉन्स्टॅक-प्लस’ गंभीर स्वरूपाच्या बद्धकोष्ठतेसाठी वापरण्यात येते. सगळ्या प्रकारच्या पोटाच्या विकारांवर व बद्धकोष्ठतेसाठी एकाच प्रकारचे चूर्ण वापरले जात होते. त्याचे कमी-जास्त प्रमाणात सेवन केल्याने इतर त्रास होत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे दोन प्रकारचे विरेचक आपण तयार करायचे निश्चित केले. त्यात आम्हाला यश मिळाले.’ हीलिंग हँड्स क्लिनिकच्या माध्यमातून सुमारे ३० हजार रुग्णांनी हे उत्पादन वापरले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संस्थेच्या सचिव डॉ. स्नेहल पोरवाल म्हणाल्या, ‘पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये मोफत निदान शिबिरे आयोजित करून त्यातून सहा हजार रुग्णांची तपासणी केली. या शिबिरांमध्ये ‘कॉन्स्टॅक’ व ‘कॉन्स्टॅक–प्लस’चे मोफत वाटप करण्यात आले.’

बद्धकोष्ठतेचे मूळ....

  • अति प्रवास

  • सतत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणे

  • जेवण आणि झोपेची वेळ न सांभाळणे

  • चाळिशीच्या नंतर व्यायामाचा अभाव

  • वृद्धापकाळातील समस्या

दुष्परिणाम....

  • दिवसभर अस्वस्थ वाटणे

  • डोके दुखणे

  • पोटात कळ येणे किंवा दुखणे

  • भूक मंदावणे

loading image
go to top