सासवडला संत सोपानदेवांच्या समाधी यात्रेत पवमान अभिषेक; पालखी नगरप्रदक्षिणा रंगली  

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

समाधी मंदिरास यात्रेनिमित्त फुलांची व तोरणाची सजावट करण्यात आली आहे. आज मुख्य दिवशी पवमान अभिषेक झाला. वारकरी, भाविक कोरोना नियम पाळून हजेरी झाली.

सासवड : आज संत सोपानदेव महाराज यांच्या समाधी यात्रेतील सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने काकड्यानंतर.. समाधीस पहाटे पवमान अभिषेक झाला. त्यानंतर समाधी सजविण्यात आली. चाळीस दिंड्यांच्या मुक्कामात किर्तने, प्रवचने रंगली आहेत. पालखी नगर प्रदक्षिणाही याचदिवशी सायंकाळी झाली. प्राक्षाळ पुजनाने ता. 12 रोजी सांगता होणार आहे. 

समाधी मंदिरास यात्रेनिमित्त फुलांची व तोरणाची सजावट करण्यात आली आहे. आज मुख्य दिवशी पवमान अभिषेक झाला. वारकरी, भाविक कोरोना नियम पाळून हजेरी झाली. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. गोपाळ गोसावी, विश्वस्त अॅड. त्रिगुण गोसावी, हिरुकाका गोसावी, पालिकेतील गटनेत्या आनंदीकाकी जगताप यांची आज उपस्थिती होती. दरम्यान आमदार संजय जगताप यांनी काल सकाळी समाधीस अभिषेक केला. यावेळी संत सोपानकाका बँकेचे अधिकारी व कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अंगलट; खुलासा करण्याचा उच्च शिक्षण विभागाचा आदेश 

सोमवारी (ता. 11) समाधी वर्णनाचे किर्तन नामदास महाराज पंढरपूर यांचे व काल्याचे किर्तन हभप कोकाटे महाराज यांचे होईल. तर त्यानंतर दहीहंडी, दिंडीप्रदक्षिणा होतानाच. मुंबई अंजीर व्यापारी मंडळाचा महाप्रसाद होईल. मंगलवारी (ता. 12) प्रक्षाळ पुजनाने यात्रेची सांगता होईल. दरम्यान दरवर्षीपेक्षा कोविड 19 मुळे गर्दी कमी आहे. हा सोहळा प्राक्षाळ पुजनानंतर सांगतेकडे जाईल. समाधी दिन यात्रेनिमित्ताने देवस्थान व सासवड नगरपालिकेतर्फे सहकार्य झाले आहे, असे संत सोपानदेव मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त अॅड. गोपाळ गोसावी यांच्याकडून सांगण्यात आले. 

RBI द्वारे सहा नव्या पेमेंट वॉलेटची सुविधा; विना इंटरनेट आवाजाद्वारे करु शकाल व्यवहार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pavman Abhishek in Samadhi Yatra of Saint Sopandeva to Saswad