

raju shetti
sakal
वडगाव मावळ: ‘‘पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न येत्या दीड महिन्यात मार्गी लावा, तसेच पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करा. तसे न केल्यास २ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांचा लाँग मार्च काढून जलसमाधी आंदोलन करू,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.