तापाची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका, उपचारासाठी महापालिकेची ३६ रुग्णालये आहेत सज्ज!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 62 पर्यंत पोचला असला तरी, 14 दिवसांच्या उपचारानंतर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढते आहे.

पिंपरी : कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने बरीच पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील महापालिकेची 8 रुग्णालये आणि इतर 28 दवाखाने (क्लिनिक) सज्ज ठेवली आहेत.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फ्लूची लक्षणे दिसताच नागरिकांनी या क्लिनिक आणि पालिका रुग्णालयांमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी, हा या मागील उद्देश आहे. सध्या वायसीएम आणि भोसरी नवीन रुग्णालयात कोरोना संसर्ग झालेल्या आणि संशयित व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. 

- पुणे : नव्या 80 रुग्णांची पडली भर; दिलासादायक गोष्ट म्हणजे...!
 
'या' ठिकाणी आहेत महापालिका रुग्णालये :
भोसरी, गव्हाणेवस्ती, सांगवी, यमुनानगर, आकुर्डी, थेरगाव, जिजामाता पिंपरी, तालेरा चिंचवड. 

'या' ठिकाणी असणारी खाजगी दवाखाने (क्लिनिक) नागरिकांसाठी उपलब्ध :
संभाजीनगर, घरकुल, दत्तनगर, त्रिवेणीनगर, प्राधिकरण, तळवडे, मोशी, चऱ्होली, बोपखेल, दिघी, म्हेत्रेवस्ती, नेहरूनगर, खराळवाडी, कासारवाडी, दापोडी, पिंपळे-गुरव, फुगेवाडी, भाटनगर, काळेवाडी, पिंपरी वाघेरे, पिंपळे-सौदागर, प्रेमलोक पार्क, चिंचवड स्टेशन, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, किवळे, पुनावळे, पिंपळे-निलख.

- Exclusive : सुप्रिया सुळे म्हणतात, ''आता 'ही' लाईफस्टाईल स्वीकारू!''

दरम्यान, शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 62 पर्यंत पोचला असला तरी, 14 दिवसांच्या उपचारानंतर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. सोमवारपर्यंत 18 जण बरे होऊन घरी गेले असून त्यात 6 जण हाय रिस्क कॉन्टॅक्‍टमधील आहेत. 

परदेशी प्रवास केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झालेले 12 जण सुरवातील वायसीएममध्ये दाखल होते. त्यांतील अवघे दोनच जण बरे होऊन घरी जाणार होते. मात्र, त्याच दिवशी हाय रिस्क कॉन्टॅक्‍टमधील 28 जणांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासण्यात आले आणि त्यातील दोन जण पॉझिटिव्ह आढळले. तेव्हापासून संख्या वाढतच आहे.

- देशातील ५९ जिल्हे कोरोनामुक्त; नियमभंगाप्रकरणी केरळ सरकारची कानउघडणी!

आता गेल्या चार दिवसांपासून हाय रिस्क कॉन्टॅक्‍टमधील रुग्णही 14 दिवसांच्या उपचारानंतर बरे होऊन घरी जाऊ लागले आहेत. मात्र, त्यांना 14 दिवस होम क्वारनटाइनच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. दरम्यान, सोमवारी एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. मात्र, 14 दिवसांच्या उपचारानंतरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला घरी सोडण्यात आले.

आजपर्यंत 18 जण बरे होऊन घरी गेले आहेत, या दोन्ही बाबी शहरासाठी दिलासादायक आहेत. सध्या 43 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 36 जणांवर वायसीएममध्ये, सहा जणांवर पुण्यात आणि एकावर परभणीत उपचार सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PCMC arranged 36 clinics for covid 19 treatment of Pimpri Chinchwad citizens