...म्हणून कंत्राटदाराला ठोठावण्यात आला दिवसाला एक लाखाचा दंड

...म्हणून कंत्राटदाराला ठोठावण्यात आला दिवसाला एक लाखाचा दंड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात 'अमृत' योजनेअंतर्गत 148 कोटींचे काम सुरू आहे. मात्र, कामाची मुदत संपण्यास चार महिन्यांचा कालावधी उरला आहे. तरी निव्वळ 40 टक्केच काम पूर्ण झाल्याचा ठपका ठेवत महापालिकेने पाटील कन्स्ट्रक्‍शन व इन्फास्ट्रक्‍चर या कंत्राटदाराला प्रतिदिन एक लाख रुपये दंड आकारण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत सुमारे 2 कोटी 10 लाख रुपये दंडात्मक कारवाई झालेली आहे.

राष्ट्रीय नागरी सुधारणा अभियान अंतर्गत (अमृत) पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मलनि:सारण व्यवस्था व प्रकल्प राबविण्यात येत आहे. शहरातील 37 ठिकाणी जलनि:सारण व मलनि:सारणाचे पाइप लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या अटी-शर्तीनुसार 7 मार्च 2018 रोजी पाटील कन्स्ट्रक्‍शन व इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडचे मालक एम. बी. पाटील यांना कामाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांनी संपूर्ण काम दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्‍यक आहे.

6 मार्च 2020 रोजी संबंधित कंत्राटदाराची मुदत संपुष्टात येत आहे. तरीदेखील शहरातील विविध ठिकाणी अर्धवट अवस्थेत काम आहे. दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी केवळ 40 टक्केच काम पूर्ण केल्याचा ठपका महापालिकेने त्यांच्यावर ठेवला आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याला करारनाम्याच्या अटीशर्थीनुसार दंडास पात्र ठरवत प्रत्येक दिवशी एक लाख रुपये दंड आकारण्यास सुरवात केली आहे. मागील सात महिन्यांपासून त्यांच्या अनामत रक्कमेतून दंडाची रक्कम वजा केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

फुगेवाडीदेखील त्यांचेच काम सुरू होते. याप्रकरणी पाटील कन्स्ट्रक्‍शन व इन्फ्राक्‍ट्रक्‍चर लिमिटेडचे एम.बी. पाटील आणि युनिटी कन्स्ट्रक्‍शन सल्लागार महेश पाठक यांना नोटीस देऊन सात दिवसांत खुलासा मागविला आहे. तसेच या दोघांवर पालिकेकडून काळ्या यादीत टाकतील

सल्लागाराला नोटीस

फुगेवाडी येथे याच ठेकेदाराचे काम सुरू होते. पावसामुळे ते काम अर्धवट राहिले होते, ते पूर्ण करण्यास त्यांनी घेतले होते. त्यासाठी त्यांनी 6 मीटर खोल खड्डा खोदला होता. संबंधित सल्लागाराने त्या दुर्घटना झालेल्या स्थळाची पाहणी केलेली नसल्याचे माहिती समोर येत आहे. याप्रकरणी सल्लागार युनिटी कन्स्ट्रक्‍शनचे महेश पाठक यांनाही महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यांना सात दिवसात खुलासा करण्याच्या सूचना केल्याची माहिती सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

कासारवाडी सीमाभिंत प्रकरणी ठेकेदार दोषी

तीन महिन्यांपूर्वी कासारवाडीत सीमाभिंत कोसळली होती. त्या घटनेत ठेकेदाराची चूक सापडल्याने ते दोषी आढळल्याचा अहवाला चौकशी समितीने दिला. त्याच्याकडून पीडित कुटुंबाला आर्थिक भरपाई देऊ केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com