पुणे : वडगाव शेरीत भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

फिर्यादी यांचा पुतण्या अभिजीत भोंगळे हा वडगाव शेरी येथील एम.डी.इंडिया हेल्थ इन्शुरन्स कंपनी या त्याच्या कंपनीमध्ये कामावर जात होता. तो पाचवा मैल बसथांब्याजवळून पायी जात होता. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने अभिजीत यांना जोरदार धडक दिली. 

पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणास भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. ही घटना 17 जानेवारीला दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरीतील पाचवा मैल बसथांब्याजवळ घडला. 

वनप्लस डिस्ट्रीब्यूशनचे काम देतो सांगून तरुणाची तब्बल 23 लाखांची फसवणूक

अभिजीत राजेंद्र भोंगळे (वय 25, रा. फडके हौद, कसबा पेठ) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अलीमुद्दीन अब्दुल सामद (वय 21, रा. चंदननगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अनिल भोंगळे (वय 60, रा. कसबा पेठ) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भोसरीत जुन्या भांडणावरून एकावर भरदिवसा गोळीबार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पुतण्या अभिजीत भोंगळे हा वडगाव शेरी येथील एम.डी.इंडिया हेल्थ इन्शुरन्स कंपनी या त्याच्या कंपनीमध्ये कामावर जात होता. तो पाचवा मैल बसथांब्याजवळून पायी जात होता. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने अभिजीत यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये अभिजीत यांच्या डोक्‍याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक नागरिकांनी तत्काळ ससून रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. अभिजीतवर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वार सामद यास अटक केली. 

तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीला अजय देवगण सिंहगडावर येणार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A pedestrian dies in a motorcycle collision in Wadgaon Sheri Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: