दहावी-बारावीच्या परीक्षा होणार; विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतच परीक्षा देण्याची मिळणार संधी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नियमित वेळापत्रकानुसार होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 'सीबीएसई'ने पुढे ढकलल्या असून त्यानुसार सुधारित वेळापत्रक मागील आठवड्यात जाहीर केले आहे.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा घेण्याच्या निर्णयावर अद्याप पालक संतप्त असतानाच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नवा निर्णय जाहीर केला आहे. त्याप्रमाणे देशात आता १५ हजार परीक्षा केंद्र असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आपल्या शाळेतच परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होऊ शकणार आहे.

- नवीन बांधकाम प्रकल्प नियमावलीत अडकले; जुनी वापरता येईना, तर नवीन प्रसिद्ध होईना!

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरिया निशंक यांनी 'सीबीएसई'च्या या निर्णयाबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.
'विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्येच परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. पूर्वी केवळ तीन हजार परीक्षा केंद्र होती. आता जवळपास १५ हजार परीक्षा केंद्रांवर परीक्षा होईल,' असे त्यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.

- विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आता त्यांना मिळणारा बोर्डिंग पास हा...!

त्यांनी हे ट्वीट केल्यानंतर असंख्य नागरिकांनी 'परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा', 'परीक्षा रद्द करावी', 'परीक्षेला मुलांना पाठविल्यास त्याचे आरोग्य सुरक्षित राहिल का', अशी मते मांडत परीक्षेच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नियमित वेळापत्रकानुसार होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 'सीबीएसई'ने पुढे ढकलल्या असून त्यानुसार सुधारित वेळापत्रक मागील आठवड्यात जाहीर केले आहे.

या सुधारित वेळापत्रकाप्रमाणे १ ते १५ जुलै दरम्यान उर्वरित विषयांच्या परीक्षा होणार आहेत. परंतु ''कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना असा निर्णय घेणे योग्य नाही," असे पालकांचे म्हणणे आहे.

- Big Breaking : आता कॉलेजही भरणार शिफ्टमध्ये; केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य!

पालकांचे म्हणणे...
- कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना, विद्यार्थी आणि पालकांचा तणाव वाढविला जातोय
- परीक्षा केंद्र वाढविण्याचा निर्णय स्वागतार्ह, पण यंदा परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे
- परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाइन घ्या
- सरकारला विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी नाही का
- लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खात्री सरकार देणार का?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

"एकीकडे मुलांना परीक्षेला पाठवावे, तर आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे मुलांना परिक्षेला न पाठविल्यास करिअरला मोठा फटका बसेल. आमची द्विधा मनस्थिती झाली आहे. कृपया सरकारनेच मार्गदर्शन करावे,"
- संतोष पोतदार, पालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pending CBSE board class 10 and 12 exams to be held at 15000 centres across country