सरकारच्या अपयशाची शिक्षा जनतेला का? 'पुन्हा लॉकडाउन'वरून आपची सरकारवर टीका!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जुलै 2020

आठ आमदार, खासदार, पालिका प्रशासन, राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबतीला चार आयएएस अधिकारी काय करत आहेत?

पुणे : राज्य सरकार अनलॉक मिशन सुरू झाल्याचे सांगत असताना पुण्यात पुन्हा लॉकडाउनने सामान्य माणसाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शहरात सरकारला आरोग्य सेवा पुरवण्यात अपयश येत असल्याने त्याचा दोष जनतेच्या माथी मारून जनताच लॉकडाऊन पाळत नसल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. सरकारच्या अपयशाची शिक्षा जनतेला दिली जात आहे, अशी टीका आपकडून करण्यात आली आहे. 

- पुण्यात लॉकडाऊन कधी सुरू होणार? पोलिस सहआयुक्त म्हणतात...​

कोरोना काळात मुख्यत्वे आरोग्य सुविधाचे मोठ्या प्रमाणावर सक्षमीकरण अपेक्षित होते. मुख्यमंत्र्यांनी विप्रोच्या सहकार्याने हिंजवडीत हॉस्पिटलची घोषणा केली, परंतु महिनाभरानंतरही ते सुरू झालेले नाही. रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मृत्यू होत आहेत. तर कोरोना रुग्णांना दवाखाना शोधत फिरावे लागत आहे. विलगीकरण कक्षांची स्थिती पाहून रुग्ण पळून जात आहेत. कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांना सेवा मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्याची स्थिती असल्याचे आपचे म्हणणे आहे. 

Big Breaking : पुण्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाची कुठे झाली बदली!

आठ आमदार, खासदार, पालिका प्रशासन, राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबतीला चार आयएएस अधिकारी काय करत आहेत? पुण्यातल्या या अपयशाला प्रशासनासोबतच स्थानिक पालिकेतील भाजपा, राज्यातील महाआघाडी आणि केंद्रातील भाजपा सरकार जबाबदार आहे, असा आरोप आपचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

तीन वर्षांनंतर झेडपीत बदल्यांचा मोसम होणार सुरू; प्रक्रियेतून 'यांना' वगळले!​

कोरोनामुळे छोटे व्यापारी, खानावळवाले, घरकामगार महिला, बांधकाम मजूर, रोजंदारीवरील कामगार, रिक्षा चालक, वाहतूकदार, लघु उद्योजक या सगळ्यांपुढे मोठे आर्थिक अरिष्ट उभे आहे. त्यामुळे असंघटीत कामगारांना किमान पाच हजार रुपये महिना मदत देणे गरेजेचे आहे.  
- मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष, आप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people are being punished for the failure of the government alleges AAP city president Mukund Kirdat