पुणेकरांनो, अफवांवर विश्‍वास ठेवू नका, हा परिसर "रेड झोन'मध्ये 

नितीन बारवकर
Friday, 8 May 2020

शिरूर तालुक्‍यात आतापर्यंत "कोरोना'चे पाच रुग्ण आढळले आहेत.

शिरूर (पुणे) : शिरूर तालुक्‍यात आतापर्यंत "कोरोना'चे पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरासह तालुक्‍यातील सर्व गावांचा "रेड झोन'मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे या गावांचा परिसर "प्रतिबंधित क्षेत्र' म्हणून जाहीर करण्यात आला आहे. 

बारमतीहून पुण्याला जाणं होणार अधिक वेगवान

शिरूर येथे झालेल्या बैठकीत खबरदारीच्या उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख म्हणाले, ""कोरोना पॉझिटिव्ह चार रुग्ण सापडल्याने शिक्रापूर, तळेगाव परिसर "कंटेनमेंट झोन' जाहीर झाला असून, तेथे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. या परिसरातील दवाखाने व औषध दुकानांबरोबरच; सर्व आस्थापना बंद राहतील. महसूल, पोलिस, सामान्य प्रशासनांना परिपत्रकाद्वारे; तर लोकांना दवंडीद्वारे सूचना दिल्या.'' 

पुणेकर तरुणाचे संयोजन अन् 21 देशांचे कलाकार  

तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले, ""पुणे जिल्हा "रेड झोन'मध्ये असल्याने शिरूरमधील सर्व गावे याच झोनमध्ये येतात. सद्यःस्थितीत, सार्वजनिक बस वाहतूक, शाळा, कॉलेज, क्‍लासेस, चित्रपटगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, व्यायामशाळा, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, उद्याने, सभागृह व थिएटरपुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील. सद्यःस्थितीत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यक्रम, खेळ, मेळावे, मनोरंजनाचे सोहळे यावरही बंदी असून, पूजापाठ, प्रार्थनेसाठीची ठिकाणे 
नागरिकांना बंद आहे.'' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

""ऑनलाइन शिक्षणाला मात्र सूट आहे. लग्नसमारंभासाठी पन्नास लोकांना "सोशल डिस्टन्सिंग'सह इतर अटी व शर्तीसह परवानगी आहे; तथापि, प्रतिबंधित क्षेत्रात सायकल, रिक्षा, मोटारींवर बंधने आहेत. अंत्यविधीला वीस जणांनीच उपस्थित राहावे. या नियम व अटींचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,'' असा इशारा तहसीलदार शेख यांनी दिला. 

""शिरूर शहरातील केवळ अत्यावश्‍यक सेवाच चालू राहतील. मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, बाजारपेठांतील दुकानांना परवानगी नाही. दूध, भाजीपाला घरपोच देण्यासाठी नगर परिषदेने "ऍप' सुरू केले आहे,'' अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. 

या बैठकीला गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पाटील, कृषी अधिकारी राम जगताप, नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे आदी उपस्थित होते. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People of Pune, don't believe the rumors, this area is in the red zone