पुणेकरांनी केले ६१ हजार मूर्तींचे फिरत्या हौदांमध्ये विसर्जन; तर तब्बल एवढ्या मूर्ती केल्या दान

Pune-Ganesh-Idol-Donate
Pune-Ganesh-Idol-Donate
Updated on

पुणे - गणेशोत्सव साधेपणाने करतानाच विसर्जनाच्या दिवशी तब्बल ६१ हजार मूर्तींचे फिरत्या हौदांमध्ये विसर्जन करून पुणेकरांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या महापालिकेच्या मोहिमेला बळ दिले. तसेच, पुणेकरांनी यंदा ५५ हजार मूर्ती दान केल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे आपापल्या पातळीवर पुरेशी खबरदारी घेत पुणेकरांनी यंदा साधेपणाने उत्सव साजरा केल्याचे दिसून आले आहे. हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्‍याच नागरिकांनी नदीपात्र आणि घाटांवर जाऊन बाप्पाला निरोप दिल्याच्या नोंदी आहेत. 

दीड दिवसाच्या विसर्जनापासून सर्वत्र म्हणजे, क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर महापालिका आणि लोकप्रतिनिधींनी फिरत्या हौदांची व्यवस्था केली होती. त्यानंतर पाचव्या व सातव्या दिवशी या हौदांची संख्या वाढविली होती. त्यानुसार नदीपात्र, घाट, विहिरी अशा पारंपरिक ठिकाणांऐवजी नागरिकांनी फिरत्या हौदांत मूर्तीचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिले असल्याचे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले. 

५५ हजार किलो निर्माल्य जमा
विसर्जनाच्या दिवशी सुमारे ५४ हजार ८७९ किलो निर्माल्य जमा झाले असून, त्यासाठी विविध भागांत १९१ ठिकाणी निर्माल्य कलशाची व्यवस्था केली होती. त्याचठिकाणी सफाई कामगार नेमून लगेचच निर्माण गोळा करून ते हलविले. मूर्तीदान करण्यासोबत फिरते हौद आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर निर्माल्य गोळा केले आहे.

61,708 - फिरत्या हौदांतील मूर्ती विसर्जन 
55,549 - दान केलेल्या मूर्ती 
1,17,257 - एकूण मूर्ती विसर्जन

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com