पुणे शहर पोलिसांकडून लॉकडाऊन काळात एवढ्या नागरिकांना ई-पास देण्यात आला

Covid-E-Pass
Covid-E-Pass
Updated on

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन घोषित केल्यानंतर पुणे शहर पोलिसांकडून चार लाख दोन हजार 243 नागरिक आणि विद्यार्थ्यांना ई-पास देण्यात आला. नातेवाइकांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी प्रवास करणा-यांच्या पासवर त्वरित निर्णय घेतला जात होता. राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी ऑनलाइन माध्यमातून ई-पास घेण्याची अट शासनाकडून सध्या रद्द करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. त्यामध्ये नागरिकांना आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवास करणे तसेच पुणे शहरात विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली होती. लॉकडाउन लागू केल्यानंतर अनेक नागरिक, कामगार, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात आलेले विद्यार्थी अडकले होते. त्यासाठी शहर पोलिसांकडून 24 मार्चपासून ऑनलाइन माध्यमातून डिजिटल ई-पास देण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती. त्या सुविधेआंतर्गत 24 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत पुणे शहर पोलिसांच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची पडताळणी करून ई-पास देण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त आणि ईपास समन्वयक पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली.

मजूर करण्यात आलेले ई-पासचे अर्ज
1) आपत्कालीन वैद्यकीय उपचार - 79,779
2) अंत्यविधीला जाण्यासाठी - 18,612
3) वैयक्तिक कारण - 1,16,393
4) विद्यार्थी - 20,285
5) इतर महत्त्वाची कारणे - 1,66,634
एकूण - 4, 02,243

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com