esakal | 'लॉकडाऊन' ही व्यसनमुक्तीची संधी; 'या' उपायाद्वारे सुटका शक्य!
sakal

बोलून बातमी शोधा

Addiction

सध्या अनेकजण समाजमाध्यमांव्दारे व्यसनमुक्ती संदर्भात प्रश्‍न विचारत आहेत. लॉकडाऊनच्या काळात घरात राहून मानसिक तणाव वाढत असल्याचे ते सागंत आहेत.

'लॉकडाऊन' ही व्यसनमुक्तीची संधी; 'या' उपायाद्वारे सुटका शक्य!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येरवडा : लॉकडाऊनच्या कालावधीत तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य असे अमलीपदार्थ मिळणे शक्य नाही. त्यामुळे हा कालावधी व्यसनमुक्तीसाठी योग्य आहे. यातून व्यसनाधीन व्यक्तींची सहज शारीरिक आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्तता होऊ शकते, असे मत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यक्त केले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या संदर्भात पुणतांबेकर म्हणाल्या, ‘‘देशात लॉकडाऊन असल्यामुळे व्यसनाधीन व्यक्तींना अंमलीपदार्थ मिळणे अवघड आहे. त्यामुळे सुरवातीच्या चार ते पाच दिवसांत व्यसनी व्यक्तींच्या शरीरातून अंमलीपदार्थांचा अंश निघून जातो. त्यामुळे त्यांना शारीरिक त्रास होत नाही.

- खूप महत्त्वाचं : कोरोना लॉकडाऊनमुळे सुधारतोय 'ओझोन'चा थर, शास्त्रज्ञ म्हणतायत...

त्यानंतरच्या कालावधीत त्यांना अंमलीपदार्थ न मिळाल्यामुळे त्यांची मानसिक गुलामगिरी सुरू होते. त्यांना अंमलीपदार्थ घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. अशा वेळी त्यांना समुपदेशनाची गरज असते. त्यांना योग्य समुपदेशन मिळाल्यास ते व्यसनमुक्त होऊ शकतात.’’

- Fight with Corona : पाकमधील हिंदू-ख्रिश्चनांना शाहिद आफ्रिदीचा मदतीचा हात!

सध्या अनेकजण समाजमाध्यमांव्दारे व्यसनमुक्ती संदर्भात प्रश्‍न विचारत आहेत. लॉकडाऊनच्या काळात घरात राहून मानसिक तणाव वाढत असल्याचे ते सागंत आहेत. त्यावर त्यांचे समुपदेश केले जात आहे. गोड पदार्थ आणि मद्य याचे समीकरण जुळत नाही. त्यामुळे मद्याचे व्यसन असलेले आणि मधुमेह नसलेल्यांनी गोड पदार्थ खाल्यास त्यांची व्यसनमुक्ती होऊ शकते, असे पुणतांबेकर यांनी सांगितले.

- होम क्वारंटाइनच्या काळात असा आहार घेऊन अशी वाढवा प्रतिकारशक्ती

loading image