पुणे : दोन आज्यांचा जीव वाचवला अन् रोहितवर काळाने घाला घातला...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 September 2019

- कुत्र वाचले पण दैवाने त्यालाच नेले

मार्केट यार्ड : शहरातील आंबील ओढा येथे रात्री अकरा वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले होते. त्यावेळी तेथील स्थानिक रहिवाशी रोहित भरत आमले यांच्या घरातही पाणी वाढले होते. पावसाचा जोर वाढतच चालला आहे हे लक्षात आल्यानंतर रोहितने घरात पाणी येतंय हे पाहिलं. त्यामुळे त्याने तातडीने घरातील दोन्ही आज्ज्यांना सुरक्षित स्थळी नेले. परंतु घरात पाळलेल कुत्र घरात राहिल्याचे लक्षात येताच कुत्र्याला वाचवण्यासाठी त्याने पुन्हा घराकडे धाव घेतली आणि कुत्र्याला घेऊन येत होता, नेमके याच वेळी रोहितवर काळाने घाला घातला. कुत्र्याला घेऊन बाहेर पडताना कुत्र वाचलं पण रोहितचे प्राण गेले. ही घटना सहकारनगर भागातील अरणेश्वर कॉलनी 5 येथे घडली. 

रात्रीच्या ढगफुटीसदृश्य पावसाने शहरात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी केली. रोहितही त्याचा बळी ठरला. रोहित ज्यावेळी कुत्र्याला वाचवायला गेला त्याचवेळी घराला लागून असणारी संरक्षक भिंत त्याच्यावर कोसळली आणि तो जागीच मरण पावला.  त्यामुळे परिसरात संतप्त आणि भयभीत वातावरण झाले आहे. 

Pune Rain : पुणेकरांना तात्काळ मदत देवू : मुख्यमंत्री

किराणा मालाचे दुकान असलेल्या, हातावरचे पोट असलेल्या घरात लहानग्याने दोन आजींचा जीव तर वाचवला आणि आपल्या कुत्र्याप्रती असलेल्या प्रेमालाही वाचवायला गेला. पण कुत्र्याला घेऊन शेजारच्या काकू आणि त्यांचा छोटा मुलगा यांच्यासह रोहित घराबाहेर पडणार तोच संरक्षक भिंत विस्कळीत होऊन त्याच्यावर कोसळली. 

पुण्यात अतिवृष्टी; शाळा, महाविद्यालयांना सुटी

रोहित आमले हा विद्या विकास मंदिर प्रशालेमध्ये दहावीच्या वर्गामध्ये शिकत होता. सोबतच आजीच्या छोट्या किराणा दुकानामध्ये तो हातभार लावत असे.  घडलेल्या घटनेबाबत परिसरामध्ये भीतीदायक हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या एवढ्याशा जीवाला नेण्यापेक्षा आम्हाला नेल असतं तर अशा शब्दात दोन्ही आज्यांना आपले अश्रू अनावर होत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Person Died after saves Two Old Age Women Pune