esakal | पाळीव श्वानांना टेकडीवर नेण्याच्या बंदीविरुद्ध याचिका
sakal

बोलून बातमी शोधा

Dog

पुणे शहरातील टेकड्यांवर फिरायला गेल्यानंतर बरोबर श्वानांना नेण्याच्या बंदी विरोधात पाषाण भागातील दोन श्वानप्रेमी महिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वनविभागाने घातलेली बंदी मागे घेण्यात यावी, अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

पाळीव श्वानांना टेकडीवर नेण्याच्या बंदीविरुद्ध याचिका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील टेकड्यांवर फिरायला गेल्यानंतर बरोबर श्वानांना नेण्याच्या बंदी विरोधात पाषाण भागातील दोन श्वानप्रेमी महिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वनविभागाने घातलेली बंदी मागे घेण्यात यावी, अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. टेकडीवर जाताना नागरिकांनी बरोबर त्यांच्या श्वानांना घेऊन येऊ नये, असा बंदी आदेश वनविभागाने दिलेला आहे. पल्लवी  कुलकर्णी आणि शर्मिला कर्वे यांनी  अ‍ॅड. अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एस. जे. काठावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात महापालिकेला प्रतिवादी केले आहे. महापालिकेला याबाबत त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे, असे अ‍ॅड. उडाणे यांनी सांगितले. टेकडीवर श्वानांना मोकळीक तरी मिळते. श्वानांना फिरायला घेऊन येण्यास घातलेली बंदी पूर्णपणे चुकीची आहे, असे पल्लवी कुलकर्णी यांनी सांगितले.

पुणे : कोरोना विषाणूचं वर्तन बदलतंय?; एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना होतेय लागण

वनविभागाने काढलेला आदेश चुकीचा आहे. मध्यंतरी टेकडीवर वनविभागाच्या एका अधिकाऱ्याला श्वान चावले होते. ते भटके होते. पाळीव श्वानाच्या हालचाली नियंत्रित असतात. त्याच्याबरोबर श्वानप्रेमी असतात. एका अधिकाऱ्याला भटके श्वान चावल्यानंतर टेकड्यांवर पाळीव श्वानांना न आणण्याचा आदेश चुकीचा आहे.
- अ‍ॅड. अजिंक्य उडाणे, याचिकाकर्त्यांचे वकील

पुण्यात पाठोपाठ बारामतीत पसरतोय कोरोना

Edited By - Prashant Patil

loading image