पुणे - औंध येथे अभिनेत्याच्या प्रतिमेला दूधाचा अभिषेक

बाबा तारे
शुक्रवार, 11 मे 2018

औंध (पुणे) : वंटास हा मराठी सिनेमा नुकताच राज्यात प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेतील अभिनेता अजय वर्पे याच्या उत्कृष्ट अभिनयाला एक पोचपावती म्हणून त्याच्या मित्रांनी या अभिनेत्याच्या भव्य प्रतिमेला हजारो लोकांच्या उपस्थितीत दुग्धाभिषेक केला.

दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांतचे चाहते याच प्रमाणे आपल्या आवडत्या अभिनेत्याला दुग्धाभिषेक करुन चित्रपट यशस्वी होण्याची प्रार्थना करतात. तसाच काहीसा प्रकार औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचा विद्यार्थी असलेला अभिनेता अजय वर्पे याच्या प्रतिमेलाही त्याच्या वर्गमीत्रांनी दुग्धाभिषेक करुन हा चित्रपट यशस्वी व्हावा यासाठी प्रार्थना केली.

यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी तरूणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून उत्साहात अभिषेक केला. औंध जकातनाका येथे हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी अनिकेत घुले, सिद्धार्थ गायकवाड, देवा जगताप, मनिष रानवडे, उद्योजक निलेश पाटील, कवी राजेंद्र सोनवणे, जयवंत कणसे, आशिषभाऊ वायदंडे यांच्याहस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन तुषार बोरकर, वसंत म्हैत्रे, प्रविण कणसे, योगेश शेटे, धनंजय फोपसे, मोहीत कपूर, योगेश गायकवाड ,कृष्णा लोंढे, प्रदिप मोरे, राहुल चव्हाण, रविराज काळे यांनी केले.

Web Title: photo of actor showered by milk in aundh pune