आळंदीत कोरोनाच्या सर्वेक्षणात पदाधिकाऱ्यांचे फोटोसेशन

विलास काटे
Friday, 18 September 2020

`माझे कुटुंब माझी जबाबदारी` अंतर्गत  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या आरोग्य सर्वेक्षणासाठी पालिकेने प्रभागनिहाय पंचेचाळिस पथक तयार केले. एकशे बाराहून अधिक प्रशिक्षित कर्मचारी शहरातील नागरिकांची घरोघरी जावून तपासणी करत असल्याची माहिती आळंदी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.

आळंदी (पुणे) : `माझे कुटुंब माझी जबाबदारी` अंतर्गत  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या आरोग्य सर्वेक्षणासाठी पालिकेने प्रभागनिहाय पंचेचाळिस पथक तयार केले. एकशे बाराहून अधिक प्रशिक्षित कर्मचारी शहरातील नागरिकांची घरोघरी जावून तपासणी करत असल्याची माहिती आळंदी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.

अजित पवार पुन्हा कडाडले, 'हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही'

याबाबत अधिक माहिती देताना मुख्याधिकारी जाधव म्हणाले, आळंदीत कोविडचे रूग्णांचा आकडा वाढत आहे. रोज पंधरा ते वीस रूग्ण आढळल्याने कोरोना रोखण्यासाठी प्रांताधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली नुकतिच बैठक झाली. `माझे कुटुंब माझी जबाबदारी` शासनाच्या उपक्रमाअंतर्गत शहरातील सुमारे आठ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण आज आणि उद्या दोन दिवसांत पू्र्ण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी शिक्षकांना यापूर्वीच प्रशिक्षण दिले.पस्तीस शिक्षक प्रशिक्षणास आले नाही. त्यांना कारणे दाखवा नोटिस दिली. मात्र, तेही सर्वेक्षणासाठी हजर आहेत.

बर्थ डे स्पेशल...अमोल कोल्हे यांच्या गनिमीकाव्यापुढे विरोधक हतबल

नागरिकांच्या तपासणीसाठी ऑक्सीमिटर, थर्मल स्कॅनर पुरविण्यात आले. पंच्च्यान्नवपेक्षा ऑक्सीजन पातळी कमी आल्यास व्यक्तींना त्वरित कोविड सेंटरमधे अॅटीजेन तपासणीसाठी पाठविले जाईल. आज सकाळी तहसिलदार सुचित्रा आमले यांनीही सर्वेक्षणाच्यावेळी घरोघरी प्रत्यक्ष काम सुरळित सुरू आहे की नाही याची पाहणी केली. जादा कर्मचा-यांची आवश्यकता भासल्यास इतर ठिकाणाहून व्यवस्था करण्याचे आश्वासन तहसिलदार आमले यांनी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्थानिक पदाधिकाऱ्यांची नुसतीच लुडबुड
प्रशासनाकडून आळंदीत नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण सुरू असताना स्थानिक पदाधिकारी मात्र, घरोघरी जाऊन फोटोसेशन करत आहेत. आधीच काही नगरसेवक राजकिय पदाधिका-यांना कोरोनाची बाधा झाली होती. सर्वसामान्य नागरिकांना घरीच थांबा बाहेर पडू नका असे प्रशासन सांगत आहे. दोन दिवसांसाठी सर्व व्यवहारही बंद आहेत. पाणीपुरवठा सुरळित नाही. रस्त्यावरच्या लाईट बंद असतात. यावर लक्ष देण्याऐवजी आता प्रशासनाच्या कामात पुढारी पुढेपुढे करून फोटो सेशन करत असल्याने टिकेचा विषय होवू लागला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Photo session of office bearers in the survey of Corona in Alandi