esakal | UPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे डोळे विद्यापीठाच्या निकालाकडे; काय आहे कारण?
sakal

बोलून बातमी शोधा

College_Students

- यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी 11 नोव्हेंबरपर्यंत मुदत
- निकाल लवकर जाहीर करण्याची विद्यार्थ्यांची मागणी 

UPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे डोळे विद्यापीठाच्या निकालाकडे; काय आहे कारण?

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) फक्त 19 दिवसात नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठीचा 11 नोव्हेंबरपर्यंतचं मुदत आहे. या अर्जात पदवीचे गुण नमूद करणे आवश्‍यक असते. त्यामुळे विद्यापीठांनी पदवीचे निकाल लवकर जाहीर करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, विद्यापीठानेही 10 नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे यापूर्वी स्पष्ट केले आहे.

कांदा चोरी करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७ लाखाचा मुद्देमाल जप्त​

'यूपीएससी'ने 4 ऑक्‍टोबर रोजी देशभरात नागरी सेवा पूर्व परीक्षा घेतली होती. कोरोनामुळे इतर स्पर्धा परीक्षा, विद्यापीठांच्या परीक्षांवर परिणाम झाला असून, पण 'यूपीएससी'ने अवघ्या 19 दिवसात निकाल जाहीर करून ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्यास सुरवात केली 'यूपीएससी'ने शुक्रवारी रात्री पूर्व परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सुमारे 4 लाख 80 हजार विद्यार्थ्यांमधून सुमारे 10 हजार 500 विद्यार्थी देशभरातून पात्र ठरले आहे.

या विद्यार्थ्यांची परीक्षा 8 जानेवारीपासून सुरू होणार होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा अंतिम टप्प्यात आली आहे, निकाल लावण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान विविध अभ्यासक्रमांचे निकाल लावले जाणार आहेत, असे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

डीएसके प्रकरण : उलाढालीची कुंडली सादर करा; तपास यंत्रणेला कोर्टाने दिली शेवटची संधी​

''नागरी सेवा पूर्व परीक्षेत मी उत्तीर्ण झालो असून, मुख्य परीक्षेसाठी मला 28 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरायचा आहे. पण मी आत्ताच पुणे विद्यापीठाच्या बीए अंतिम वर्षाची परीक्षा दिली आहे, त्याचा निकाल 11 नोव्हेंबरपूर्वी जाहीर झाल्यास मला दिलासा मिळेल.''
- एक विद्यार्थी.

''मी मेकॅनिकल इंजिनिअरींगची शेवटच्या वर्षाची परीक्षा आत्ताच दिली आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत 'आयबीपीएस' परीक्षेचा अर्ज भरायचा असून, त्यासाठी पदवीचे गुण आवश्‍यक आहे. कोरोनामुळे परीक्षेला उशीर झाला असला तरी आता माझा निकाल न मिळाल्यास वर्ष वाया जाऊ शकते.''
- एक विद्यार्थिनी

''कोरोनामुळे अनेक परीक्षांना विलंब झाला आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी निवड झाली आहे. त्या विद्यार्थ्यांनी याबाबत 'यूपीएससी'ला ई-मेल करून त्यांची अडचण मांडल्यास त्यांना मुदतवाढ मिळू शकेल. विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही.''
- डॉ. सुशील बारी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top