esakal | दौंड तालुक्यातील छायाचित्रकारांकडून सरकारकडे मदतीची मागणी

बोलून बातमी शोधा

photographer
दौंड तालुक्यातील छायाचित्रकारांकडून सरकारकडे मदतीची मागणी
sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे दौंड तालुक्यातील ३५० छायाचित्रकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने छायाचित्रकारांना मदत करण्याची मागणी दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश लांडगे यांनी या बाबत माहिती दिली. २३ एप्रिल रोजी दौंड तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली. मागील वर्षाच्या लॅाकडाउन मुळे अडचणीत आलेले छायाचित्रकार सावरण्याच्या तयारीत असताना चालू वर्षी ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध कठोर केल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा: पुणे : वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता जैववैद्यकीय कचऱ्यासाठी विघटन प्रकल्प

लाखो रूपयांचे कर्ज काढून छायाचित्रकारांनी महागडे कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरा, स्टूडिओ मधील अत्याधुनिक उपकरणे, संगणक आणि ड्रोन कॅमेरे विकत घेतले असून निर्बंधांमुळे ग्राहक नसल्याने कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले आहे. साखरपुडा, लग्न, वाढदिवस, सार्वजनिक कार्यक्रम, आदी समारंभ रद्द झाल्याने छायाचित्रकारांची उपासमार सुरू आहे. बचत आणि उसनवारी करून छायाचित्रकारांनी मार्गील वर्षी उदरनिर्वाह केला परंतु आता त्यांच्याकडे दैनंदिन खर्चासाठी पैसे न उरल्याने कोरोना प्रतिबंध नियमांनुसार दुकाने उघडण्याची परवानगी मागण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष वैभव म्हेत्रे, सुनील मुलचंदानी, खजिनदार सचिन गायकवाड, संचालक सुशांत जगताप, कैलास पंडित, सुनील मोरे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर