लग्नातील हौस होतेय पूर्ण; आवडत्या ठिकाणी छायाचित्रण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

‘कोरोनामुळे आमच्या लग्नाचा मुहूर्त लांबणीवर पडला. एकाच दिवसात लग्नाचा ट्रेंड सुरू झाल्याने फोटो शूटिंगची हौस होईल की नाही, अशी शंका होती. मात्र आता कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्याने आम्ही नुकतेच प्री-वेडिंग फोटोशूट केले. त्यामुळे आपण प्री-वेडिंग फोटोशूट केले नाही, याची सल आता मनात राहणार नाही.’ असे सांगत भावी वधू श्रुती पाटील यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

पुणे - ‘कोरोनामुळे आमच्या लग्नाचा मुहूर्त लांबणीवर पडला. एकाच दिवसात लग्नाचा ट्रेंड सुरू झाल्याने फोटो शूटिंगची हौस होईल की नाही, अशी शंका होती. मात्र आता कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्याने आम्ही नुकतेच प्री-वेडिंग फोटोशूट केले. त्यामुळे आपण प्री-वेडिंग फोटोशूट केले नाही, याची सल आता मनात राहणार नाही.’ असे सांगत भावी वधू श्रुती पाटील यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्रुती आणि अक्षय यांचे पुढील आठवड्यात लग्न आहे. गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला. मोठ्या थाटामाटात लग्न करायचे म्हणून त्यांनी प्री-वेडिंग ते रिसेप्शनपर्यंतचे फोटोशूट कसे असेल या सर्व गोष्टी ठरविल्या होत्या. मात्र कोरोनाने त्या सर्वांवर पाणी फिरवले. त्यामुळे किमान लग्नापूर्वीचे फोटोशूट करण्याचा त्यांचा अट्टहास पूर्ण झाला आहे. कोरोनाचे संकट आणि त्याबाबतची शासकीय नियमावली यामुळे एकाच दिवसांत मोजक्‍या माणसांत अनेकांची लग्न उरकली. त्यामुळे त्या जोडप्यांना फोटो सेशनची हौस काय भागवता आली नाही. मात्र आता कोरोनाच्या परिस्थितीत काहीसा सुधार झाल्याने व प्रशासकीय परवानगीचा अडथळा नसल्याने आवडत्या ठिकाणी प्री-वेडिंग फोटोशूटही पुन्हा सुरू झाले आहे. 

चोरट्यांनी दागिन्यांसह चोरले अंडरवेअर, बनियानही; बोपखेल येथील घटना

फोटोग्राफर रिहान तंबोली म्हणाले, ‘‘कोरोनामुळे यंदा लग्नाच्या फोटोशूटच्या ऑर्डरच आल्या नाहीत. सध्या लग्नांचे प्रमाण वाढत आहेत. परंतु, संख्येवर निर्बंध असल्यामुळे फोटो शूटचे बजेटही कमी केले आहे. साखरपुडा, प्री-वेडिंग, हळद, लग्न आणि रिसेप्शन असे पूर्ण पॅकेज पूर्वी ठरविले जात होते. आता एकाच दिवशी सर्व कार्यक्रम होत असल्याने बजेट आणि ऑर्डर कमी झाल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा प्री-वेडिंगचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा फोटोग्राफी करणाऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी आशा आहे. 

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 

लग्नात लोकांची संख्या व त्यासाठी दिला जाणारा वेळ कमी झाला असला तरी सर्व विधी केले जात आहेत. फोटोंची संख्या कायम आहे. सध्या आमचे उत्पन्न ६० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. आता काही प्रमाणात ऑर्डर यायला सुरुवात झाली आहे. गरजेच्या फोटो व्यतिरिक्त प्री-वेडिंग फोटोशूटदेखील केले जात आहे, ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. 
- महेश तावरे, फोटोग्राफर 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Photography favorite place where wedding craving is complete