बारामतीत सुरू झाली उद्योगाची चक्र ; 'पियाजिओ'ने  पुन्हा सुरू केली फॅक्टरी

Piaggio reopens factory in Baramati.jpg
Piaggio reopens factory in Baramati.jpg

पुणे : पुणे जिल्ह्यातील उद्योगांची चक्र आता फिरू लागली आहेत. प्रमुख उद्योगांनी आपल्या फॅक्टरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती मधील सर्वात मोठा उद्योग असणाऱ्या पियाजियो कंपनीने  आपले कामकाज सुरू केले आहे. या कारखान्यात सुमारे साडेचार हजार कामगार काम करतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 इटालियन पियाजिओ ग्रुपची १००% सहाय्यक आणि छोट्या व्यावसायिक वाहनांची निर्मिती करणारी भारतातील आघाडीची कंपनी पियाजिओ व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेडने (पीव्हीपीएल) बारामती येथे आपल्या फॅक्टरी मध्ये पुन्हा उत्पादन सुरू केले आहे. सरकारच्या सुरक्षा निर्देशकांनुसारच ३ ही प्लांट्स सुरु झाले आहेत. कंपनीने आपली ६ रिजनल ऑफिसेस देखील देशभरात सुरु केली आहेत.  निर्जंतुकीकरण आणि कमीतकमी उपस्थिती याचा अवलंब करुन देशभरातील डिलरशिप्स देखील सुरु केल्या आहेत. कमर्शियल व्हेइकल्सच्या १३५ आणि दुचाकीच्या ६५ डिलरशिप्स कंपनीने सुरु केल्या आहेत. यामुळे ग्राहकांना विविध सेवा आणि मुदत वाढवून दिलेल्या वॉरंटीचा लाभ घेता येणार आहे.

रेशनकार्डाच्या नियमात केंद्राकडून बदल; तब्बल एवढ्या लोकांना होणार फायदा

'पियाजिओ'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (पियाजिओ व्हेइकल्स) दिएगो ग्राफी  म्हणाले, "आमच्या कर्मचाऱ्यांचे आणि ग्राहकांचे तसेच विविध डीलर्स चे आरोग्य आणि सुरक्षा हे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आम्ही आमच्या फॅक्टरी मध्ये सरकारी निर्देशांचे पालन करत सुरक्षेच्या सर्व गोष्टींची अंमलबजावणी केली आहे. सोशल डिस्टंसिन्ग आणि निर्जंतुकीकरणाचे
 सर्व नियम आम्ही पाळत आहोत. आमच्या ग्राहकांच्या सुरक्षेचा देखील विचार करत  डिलरशिप्समध्ये देखील सर्व आदेशांचे पालन करत आहोत."ही कंपनी सुरू झाल्यामुळे बारामती औद्योगिक पट्ट्यात आणि कामगारांमध्ये पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत.
मोठी बातमी : रांगेत न थांबता दारू मिळणार; पुण्यात ई-टोकनला सुरवात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com