मोठी बातमी : श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानची यात्रा रद्द!

Sri_Kshetra_Veer
Sri_Kshetra_Veer

गराडे (पुणे) : श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानची यात्रा २६ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत होणार होती, मात्र तालुक्यातील सर्वात मोठी असलेली ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे तहसीलदार रुपाली सरनोबत आणि आमदार संजय जगताप यांनी घेतलेल्या बैठकीत ठरविण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोना काळ चालू असल्याने १४४ कलम लागू करण्यात येईल. असा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांच्याकडे पाठवला जाणार असल्याचे तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी यावेळी सांगितले.

दिनांक २५ फेब्रुवारीपासून वीर गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे वीर गावांमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांनी यात्रेसाठी येऊ नये, असे आव्हान सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप आणि देवस्थान कमिटीकडून करण्यात आले आहे. मानकरी खांदेकरी यांच्या उपस्थित साध्या पद्धतीने देवाची पूजा अर्चा संपन्न होणार आहे. यावेळी पुरंदरचे गटविकास अधिकारी अमर माने, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक आदी उपस्थित होते.

श्रीक्षेत्र श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान, वीरचे अध्यक्ष संतोष धुमाळ, विश्‍वस्त बाबूराव धुमाळ, अभिजीत धुमाळ, बाळासाहेब धुमाळ, रामभाऊ धुमाळ, तानाजी धुमाळ, धैर्यशील धुमाळ, राजाभाऊ बुरुंगले, पोपटराव बुरुंगले, माजी सरपंच माऊली वचकल, देवस्थानचे सचिव सय्यद मुलाणी आणि श्रीक्षेत्र म्हस्कोबा देवस्थान कोडीत येथील देस्थानचे अध्यक्ष  बाळासाहेेब बडदे, माजी अध्यक्ष बाळासाहेेब बडदे, अनिल बडदे, शेखर बडदेे, विठ्ठल बडदे, स्वप्निल बडदे, अश्रू बडदेे, अतुल बडदे, संजय बडदे, राजू बडदे, प्रवीण बडदे, राजेश बडदे, योगेश बडदे आदी उपस्थित होते.

शेकडो वर्षाची परंपरा असणारी वीरची श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा यावर्षी कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या या वीर यात्रेच्या ठिकाणी भाविकांनी गर्दी करू नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com