
पिंपरी: प्रेमप्रकरणाच्या संशयावरून पिंपळे गुरवमधील देवकर पार्क येथे अकरा जणांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. रामेश्वर घेंगट (वय २६) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली. याप्रकरणी मृताचे वडील रवी घेंगट (रा. शूरवीर चौक, ताडीवाला रोड, बंडगार्डन, पुणे) यांनी फिर्याद दिली.