
पिंपरी - शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून, विस्तारही तितकाच झाला. बसची संख्या वाढूनही केवळ जागेअभावी पीएमपी आगाराच्या संख्येत वाढ झाली नाही. सर्वसामान्य प्रवाशांसाठी आजही शहराच्या कानाकोपऱ्यात वाहतूक व्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे. त्यातुलनेत वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता पीएमपीच्या आगारातही वाढ होणे गरजेचे आहे. आगाराच्या कमतरतेमुळे सार्वजनिक वाहतूक दिवसेंदिवस सक्षम होण्याऐवजी कोलमडल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या शहरात वीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ निगडी, भोसरी व नेहरूनगरमध्ये तीन आगार आहेत. शहराला सध्या चार आगारांची तातडीने गरज आहे. महापालिकेकडून चऱ्होली व वाकड येथे पीएमपीला मिळणाऱ्या आरक्षित जागांच्या प्रस्तावांचे काम अंतिम टप्प्यात आहे. पीएमपीला ही जागा ई-बससाठी ताब्यात मिळणार आहे. मात्र, अद्याप हे प्रस्ताव महापालिकेकडे रेंगाळत पडले आहेत.
हेही वाचा : ससूनमध्ये गरीब रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
आगाराची गरज असलेल्या भागातून सध्या दिवसाला शंभरच्या वर बसेस धावत आहेत. आगार नसल्याने या ठिकाणी पार्किंगची समस्या उद्भवत आहे. परतीच्या व लांब पल्ल्याच्या गाड्यांना जागा मिळत नसल्याने या गाड्या रिकाम्या परतत आहेत. थांबे नसल्याने बसेस कोठेही पार्किंग केल्या जात आहेत. त्यामुळे चोरीच्या घटना घडत आहेत. या सर्वांचा परिणाम पीएपीच्या उत्पन्नावर होऊ लागला आहे.
जागेचे प्रस्ताव कागदावरच
पीएमपीचे विलीनीकरण २००७ मध्ये झाले. त्या वेळी पीएमपीच्या ताफ्यात पिंपरीसाठी तीन आगार होते. सध्या दोन हजारांवर बसच्या संख्येत वाढ होऊनही तीनच आगार आहेत. पीएमपी विलीनीकरणाला बारा वर्ष उलटूनही पीएमपीला लागणाऱ्या आगाराच्या जागेला अद्याप पुरेशी जागा मिळाली नाही. जागेचे प्रस्ताव कागदावरच अडकून पडले आहेत. भोसरीतील मध्यवर्ती सुविधा केंद्राची आठ हजार ५४० चौरस मीटर जागाही अद्यापपर्यंत पीएमपीच्या ताब्यात आली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.