उद्योगनगरीही 'स्मार्ट'; पिंपरी चिंचवडचा 'स्मार्ट सिटी' अभियानात समावेश

दीपेश सुराणा
शुक्रवार, 23 जून 2017

पिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या देश पातळीवरील तिसऱ्या फेरीत पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी ट्‌विटद्वारे याबाबत माहिती दिली.

पिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या देश पातळीवरील तिसऱ्या फेरीत पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी ट्‌विटद्वारे याबाबत माहिती दिली.

स्मार्ट सिटी अभियानाच्या तिसऱ्या फेरीत 30 शहरांची निवड झाली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे. स्मार्ट सिटी अभियानात सुरवातीला पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर यांचा एकत्रित प्रस्ताव पाठविला होता. मात्र, दोन्ही शहरे वेगवेगळी असल्याने पुणे शहराचा योजनेत समावेश केला. पिंपरी-चिंचवड महापालिका रॅंकिंगमध्ये चौथ्या स्थानावर असतानाही स्मार्ट सिटीतून वगळले होते. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेने स्मार्ट सिटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या फेरीसाठी निवड केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्‌विटद्वारे ही माहिती दिली होती. आता तिसऱ्या फेरीत शहराची निवड झाली आहे.

स्मार्ट सिटीबाबतचा प्रस्ताव 31 मार्चला महापालिकेने केंद्र सरकारकडे सादर केला होता. या प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारकडून महापालिकेला पाच वर्षांत 500 कोटी, राज्य सरकारकडून 250 कोटी, तर महापालिका स्वहिस्सा रक्कम 399 कोटी असा निधी उपलब्ध होणार आहे.

■ 'स्मार्ट सिटी'मुळे काय होणार?

  • माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सुविधांचे सक्षमीकरण
  • पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, पथदिवे, सिग्नल यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पार्किंग आदी विविध पायाभूत सुविधांचा विकास
  • नागरिकांना चांगल्या क्षमतेने मिळणार पायाभूत सुविधा

स्मार्ट सिटी अभियानात देशपातळीवरील तिसऱ्या फेरीत पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. स्मार्ट सिटीमध्ये महापालिका स्वहिस्सा रकमेसह एकूण एक हजार 149 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी एसपीव्ही कंपनी स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रकल्प अंमलबजावणीस शहरात तत्काळ सुरवात केली जाईल. शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने आवश्‍यक प्रयत्न राहतील.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त.

शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यामुळे शहरातील नागरिक आनंदित झाले आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहर जास्तीत जास्त स्मार्ट कसे होईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पात उपलब्ध होणाऱ्या निधीचा त्यासाठी योग्य वापर केला जाईल.
- नितीन काळजे, महापौर

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
चित्रपट निर्मात्याविरोधात नीरजा भनोतचे कुटुंबीय न्यायालयात
औरंगाबादेत पेट्रोलपंपावर छापे; वैधमापनशास्त्र पथकाकडून मोजमाप
बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे 'धोंडी धोंडी कर्ज दे' आंदोलन
धुळे : कर्मचाऱ्यांची वाट पाहता स्वच्छता करण्याचा तरुणांचा निर्धार!
डोंबिवलीत कामगाराला आले 62 हजार रुपये वीजबिल
आर्ची-परशा, सचिन-सुप्रिया, अशोकमामा येणार 'ई सकाळ'वर लाईव्ह
सोलापूरमध्ये वीजबिल भरणा केंद्रे सुटीतही राहणार सुरू
‘नकुशी’मध्ये होणार उषा नाडकर्णी यांची एंट्री
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या पोर्टलमध्ये 'एरर'
'कष्टकरी व सरकारी कर्मचाऱयांचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad news marathi news smart city project