औरंगाबादेत पेट्रोलपंपावर छापे; वैधमापनशास्त्र पथकाकडून मोजमाप

मनोज साखरे
शुक्रवार, 23 जून 2017

औरंगाबाद - पेट्रोलपंपावर इंधनात मापात पाप करण्याचे प्रकार उघड झाल्यानंतर सर्वच ठिकाणी पेट्रोलपंपांची कसून तपासणी करण्यात येत आहे. इंधन चोरीच्या संशयावरून ठाणे येथील गुन्हेशाखा, स्थानिक पोलिस व वैधमापनशास्त्र विभागाकडून औरंगाबादेतील पेट्रोलपंपावर आज (शुक्रवार) छापे टाकण्यात आले.

औरंगाबाद - पेट्रोलपंपावर इंधनात मापात पाप करण्याचे प्रकार उघड झाल्यानंतर सर्वच ठिकाणी पेट्रोलपंपांची कसून तपासणी करण्यात येत आहे. इंधन चोरीच्या संशयावरून ठाणे येथील गुन्हेशाखा, स्थानिक पोलिस व वैधमापनशास्त्र विभागाकडून औरंगाबादेतील पेट्रोलपंपावर आज (शुक्रवार) छापे टाकण्यात आले.

पंपांवर इलेक्‍ट्रॉनिक चीपच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेल चोरीचे प्रकार समोर आले आहेत. ठाणे, नाशिक शहरातही इंधनचोरीचे प्रकार उघड झाले. यासंबंधीच्या तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. त्यानंतर पेट्रोलपंपावर छापे घालण्याचे सत्रच प्रशासनाकडून अवलंबवण्यात आले आहे. पाच दिवसांपूर्वी शहर गून्हेशाखेने केलेल्या पेट्रोलपंप तपासणीनंतर आज सकाळी ठाणे येथील गुन्हेशाखेचे पथक औरंगाबादेत पोचले. त्यांच्यासोबत स्थानिक पोलिस व वैधमापनशास्त्र विभागाची टिम आहे. चिपद्वारे पेट्रोलपंपांची तपासणी करण्यात येत असून पथक शहरातील चून्नीलाल पेट्रोलपंपावर दुपारी धडकले. तेथे तपासणी सुरु आहे. यानंतर अन्य पेट्रोलपंपावर तपासणी करण्यात येईल व सदोष पेट्रोलपंपांना सील केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
इस्रोकडून एकावेळी तब्बल 31 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित
एक लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी शक्‍य
बीडः पंचायत समितीच्या माजी सभापतीने केला गोळीबार
नीट परिक्षेत पंजाबचा नवदीप पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक पहिला
रामनाथ कोंविंद यांनी भरला राष्ट्रपती निवडणुकीचा अर्ज
पानशेत, वरसगाव, टेमघर: तेवीस दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस
औरंगाबाद : आळंद येथे टेम्पोची कारला धडक; 1 गंभीर
विधवांच्या आयुष्यात येतोय आशेचा किरण!
तुकाराम महाराज पालखी मार्गावर वाहतुकीचा बोजवारा
आमदार गजबेंच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या
दारू व्यावसायिकाकडून लाच घेताना पाेलिसाला अटक
एकतर्फी प्रेमातून शिक्षकाला मारहाण