पिंपरी महापालिकेच्या शिल्लकी रक्कमेचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर

Pimpri Municipal Balance Budget presented before the Standing Committee
Pimpri Municipal Balance Budget presented before the Standing Committee

पिंपरी : महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून पाच कोटी ७७ लाख रुपयांचे शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर करण्यात आला. २०२०-२१ चे अपेक्षित उत्पन्न पाच हजार २३२ कोटी ५७ लाख रुपये इतके होते तर अपेक्षित खर्च पाच हजार २२६ कोटी ८० लाख रुपये इतका होता. मार्च २०२१ अखेर पाच कोटी ७७ लाख रुपय शिल्लक आहेत.


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयुक्तांकडून २०१९-२० चे सुधारित व २०२०-२१ चा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प चार हजार ६२० कोटी ७८ लाख रुपयांचा होता.आगामी अर्थसकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत ६११ कोटी ७९ लाख रुपयांनी जास्त जमा रकमेचा आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवरून कोणत्या गाड्या केल्या रद्द? का?

सार्वजनिक सुरक्षितता व स्थापत्य विषयक कामांसाठी ४०.४० टक्के खर्च केला जाणार आहे. पाणी पुरवठ्यासाठी ४८८ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. वस्तू व सेवा करातून १९०० कोटी रुपये अपेक्षित उत्पन्न आहे. पाणी पुरवठ्यासाठी आंद्रा व भामा आसखेड प्रकल्प, चिखलीत जल शुध्दीकरण प्रकल्प उभारणे व पवना नदीवरील रावेत बंधारा येथील अशुद्ध जल उपसा केंद्राची शंभर दश लक्ष लिटर प्रती दिन क्षमता वाढविण्यासाठी स्वतंत्र तरतूद केली आहे.

प्रवाशांची अडवणूक न करता खेड-शिवापूर टोल नाक्यावर झाले आंदोलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com