पिरंगुटला विक्रेत्यामूळे वाहतूक कोंडी; सोशल डिस्टंसिंगचे वाजले तीन तेरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

मुळशीत लॅाकडाऊन शिथील केला खरा पण, त्याचवेळी सोशल डिस्टंशिंगचे तीन तेरा आणि त्याहीपेक्षा वाहतुकीचा वाजला बोजवारा., अशी दयनीय परिस्थिती पिरंगुट परिसरात सध्या अनुभवायला येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुळशीत संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी असतानाही अनेक दुकानदा, भाजीवाले, मासेविक्रेते, चिकन विक्रेते पाचनंतरही माल विकण्यास बसलेले असतात.

पिरंगुट - मुळशीत लॅाकडाऊन शिथील केला खरा पण, त्याचवेळी सोशल डिस्टंशिंगचे तीन तेरा आणि त्याहीपेक्षा वाहतुकीचा वाजला बोजवारा., अशी दयनीय परिस्थिती पिरंगुट परिसरात सध्या अनुभवायला येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुळशीत संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी असतानाही अनेक दुकानदा, भाजीवाले, मासेविक्रेते, चिकन विक्रेते पाचनंतरही माल विकण्यास बसलेले असतात. पोलिसही या विक्रेत्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही दुकाने चालूच असतात. ग्राहकही कुठे सोशल डिस्टंशिंग पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''पाचनंतर चालू असलेल्या भाजी विक्रेते, मासे विक्रेते, दुकानदार यांच्यावर तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवरही रोजचे रोज कारवाई करावी. तसेच पिरंगुटला रोज एक पोलिस कर्मचारी अथवा ट्रॅफिक वॅार्डन नेमावा,'' अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.'

पुणे-कोलाड रस्त्यावर पिरंगुट (ता.मुळशी) येथील कँप परिसरात वाहतूकीची कोंडी नित्याचीच झाली असून ग्रामपंचायत आणि पोलिस खात्यानेही त्याकडे दुर्लक्ष केल्याने या कोंडीत आणखी भर पडत चालली असून रोजच वाहतूकीचा खोळंबा होत आहे. सोशल डिस्टंशिंग हे शब्द तर फक्त कागदावरच राहिलेले दिसतात. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे कोरोनाचा धोकाही वाढला आहे. 

पुणेकरांनो, ही लेणी आहे तुमच्या हाकेच्या अंतरावर...तिच्यात असणारी वैशिष्ठ्ये जगात कोठेही नाहीत... 

लॅाकडाऊन शिथिल होताच येथील पुणे कोलाड रस्त्यावर कँप भागात भाजीवाले, हातगाडीवाले, पथारीवाले तसेच किरकोळ विक्रेत्यांनी भर रस्त्यातही आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या रिक्षा तसेच अन्य प्रवासी वाहने रस्त्यावरच उभी असतात. दर रविवारी पिरंगुटचा आठवड्याचा बाजार भरण्याचा दिवस असल्याने या दिवशी रस्त्यालगच्या विक्रेत्य़ांकडे माल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली असते. ग्राहकांची वाहने रस्त्यातच उभी असतात. या परिसरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आहेत. आलेला माल दुकानांत उतरवून घेताना संबंधित वाहने बराच वेळ रस्त्यावरच उभी राहतात त्यामुळेही कोंडी निर्माण होत असते.  पोलिसांनी यापूर्वी अनेकदा येथील रिक्षा , टेंपो तसेच अन्य वाहन चालकांवर केलेली दंडात्मक तसेच अन्य कारवाई ही केवळ तत्कालिन मलमपट्टी ठरली आहे. 

निवृत्तीनाथांच्या पादुका विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ

''ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, लवळे फाटा परिसर, लवळे रस्ता, उरवडे रस्ता , पिरंगुट कँप तसेच घोटावडे फाटा येथील परिसरात संध्याकाळी पाच वाजल्यानंतरही काही भाजीवेक्रेते, मासे विक्रेते तसेच दुकानदार माल विक्रीसाठी बसलेले असतात. पाच वाजता दुकाने बंद करा, '' असे वारंवार सांगूनही त्यांची दुकाने चालूच असतात. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी वारंवार व रोजचे रोज कारवाई करावी , अशी मागणी केली आहे. याशिवाय वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवरही रोजचे रोज कारवाई करण्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pirangut traffic issue by sellers social distencing