बारामतीत फिरत होता संशयास्पद तरुण, पोलिसांच्या झडतीत सापडले... 

मिलिंद संगई
Wednesday, 24 June 2020

पोलिसांकडून गस्त सुरू असताना नीरा रस्त्यावर एक संशयास्पद युवक हिरो शाईन गाडीवर फिरत होता. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पोलिसांनी पाठलाग करुन पकडल्यावर त्याच्याकडे

बारामती (पुणे) : बारामती शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन गावठी पिस्तूल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. एकाच दिवशी दोन पिस्तूल सापडल्याने पोलिसही चक्रावून गेले असून, दोन्ही संशयितांकडे तपास सुरु करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी दिली. 

आदिवासी भागातील पूजा शिवाजी भोईर हिची झाली तहसीलदारपदी निवड    

फौजदार योगेश शेलार व स्थानिक गुन्हे शोध पथकांच्या पोलिसांकडून गस्त सुरू असताना नीरा रस्त्यावर एक संशयास्पद युवक हिरो शाईन गाडीवर फिरत होता. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पोलिसांनी पाठलाग करुन पकडल्यावर त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे मिळाली. राजेंद्र सर्जेराव भंडलकर (रा. को-हाळे बुद्रुक, ता. बारामती) असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यातील हे शहर तीन दिवसांसाठी सील

सदरचे पिस्तूल हे प्रतिक भालचंद्र शिंदे (रा. इंदापूर रोड, हरिकृपानगर, बारामती) याचे असल्याचे त्याने सांगितले. प्रतिक शिंदे याच्या घराच्या झडतीत घरात ठेवलेले दुसरे गावठी पिस्तूल मिळाले. सदर पिस्तुलांची किंमत 1 लाख 60 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत फौजदार पद्मराज गंपले, योगेश शेलार, संदीपान माळी, ओंकार सिताप, पोपट नाळे, राजेश गायकवाड, सिध्देश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे, अंकुश दळवी, दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pistol seized from youth in Baramati