पुणे विद्यापीठ चौकातील पुलाचा आराखडा तयार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्यासंदर्भातील प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या आराखड्यास शुक्रवारी तत्त्वत: मान्यता दिली. यासंदर्भात वाहतूक पोलिसांशी चर्चा करून तो अंतिम करावा, अशा सूचनाही त्यांनी या वेळी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणे - पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्यासंदर्भातील प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या आराखड्यास शुक्रवारी तत्त्वत: मान्यता दिली. यासंदर्भात वाहतूक पोलिसांशी चर्चा करून तो अंतिम करावा, अशा सूचनाही त्यांनी या वेळी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अधिकाऱ्यांना दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान इलेव्हेटेड मेट्रो प्रकल्पाचे काम ‘पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे. या योजनेतंर्गत विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल अडथळा ठरत असल्याने तो नुकताच पाडण्यात आला. त्या ठिकाणी मेट्रोसाठी दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन ‘पीएमआरडीए’कडून करण्यात येत आहे. हे काम टाटा-सिमेन्स या कंपनीला देण्यात आले आहे.

डीएसके प्रकरण : फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट कोर्टात दाखल करा; वकिलांनी केली मागणी

उपमुख्यमंत्री पवार यांनी आज ‘पीएमआरडीए’ कार्यालयास भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी टाटा-सिमेन्स या कंपनीकडून विद्यापीठ चौकात उभारण्यात येणाऱ्या नियोजित उड्डाणपुलाच्या प्रारूप आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plan of the bridge at Pune University Chowk prepared