... म्हणून डॉक्टरांनी सगळी ऑपरेशन्स पुढे ढकलली!

Surgey-Hospitals
Surgey-Hospitals

Coronavirus : पिंपरी : शहरातील बहुतेक सर्व लहान-मोठ्या रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ३१ मार्चनंतर पुढील आदेशानुसार या शस्त्रक्रियांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

स्टर्लिंग हॉस्पिटलचे संचालक डॉ. राकेश नेवे म्हणाले, "मागील आठवडाभरापासून आमच्या रूग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्यावर रुग्णाच्या जीवाला धोका राहणार नाही. अशाच शस्त्रक्रियांचा त्यात समावेश आहे. त्यामध्ये, प्रामुख्याने हार्निया, जॉईंट रिप्लेसमेंट, मणके आणि कान या रुग्णांवरील शस्त्रक्रिया काही दिवसांनी केल्या जातील. रुग्णाची प्रकृती कशी आहे हे पाहून बायपास किंवा अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत."

चिंचवड येथील धनश्री हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. संतोष घोडके म्हणाले, "सध्या केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. राज्य सरकार च्या निर्देशानुसार ३१ मार्च पर्यंत नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. डोळे, मणका, खांदे यावरील शस्त्रक्रियांचा अंतर्भाव आहे."

रूग्णालयातील कर्मचारी वर्गाला सुट्टी

रुग्णालयातील वैद्यकीय सेवेत कार्यरत नसलेल्या कर्मचारी वर्गाला सुट्टी देण्यात आली आहे. काही रुग्णालयात दक्षता म्हणून कर्मचारी वर्गाला रजा मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे, रुग्णालयात कर्मचारी संख्याही निम्म्यावर आली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे पिंपरी चिंचवड शाखेचे सचिव डॉ. सुधीर भालेराव म्हणाले, "माझ्या रुग्णालयात दर आठवड्याला सरासरी १२ नियोजित शस्त्रक्रिया होत असतात. पिंपरी चिंचवड मध्ये सुमारे ४५० रुग्णालये आहेत. त्यामध्ये, दरमहा किमान ५०० नियोजित शस्त्रक्रिया होत असतात. या सर्व नियोजित शस्त्रक्रिया सध्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कदाचित, आणखी महिनाभर देखील या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या लागतील."

कोरोनाशी निगडीत बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com